दु:खद; नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिर्दी यांचे निधन

नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिर्दी यांचे आज 8 जुलै रोजी नियमित सायकलिंग करत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.

जसपाल  हे  नाशिक ते इगतपुरी दरम्यान सराव करत होते तेव्हाच ही घटना घडली आहे. जसपाल यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ताबडतोब पाथर्डी फाटा येथील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथील डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले पण उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना मृत घोषित केले आहे.

नाशिक मध्ये सायकल चालवणे लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले होते. नाशिक सायकलिस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक सायकलपटूंना सतत उत्साहित केले होते. चांगले काम  केले त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचले  होते. नुकतीच त्यांनी सायकल वारी करत पंढरपूर येथे दर्शन घेतले होते.

Jaspal singh virdi nashik cyclists

नाशिक रँडोनर्स मायलर्स या उपक्रमात आज (दि.८) ते सहभागी झाले होते. नाशिक मुंबई महामार्गावर पाथर्डी फाटा येथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी विर्दी यांना ताबडतोब जवळील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आपत्कालीन विभागात उपचारादरम्यान सुरू होते. त्यादरम्यान डॉक्टरांनी जसपाल सिंग यांना मृत घोषित केले.

शासकीय रुग्णालयात विर्दी यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी 11:30 नंतर सिंग हाऊस, नाईस एरिया, सातपूर येथे ठेवण्यात येणार आहे.

मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले आहे. जसपाल सिंग बिर्दी यांच्याकडे नाशिक सायकलीस्टचे सारथी झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक महिन्यात एक सामाजिक उपक्रम राबवत सायकलिंगचा प्रचार केला. त्यांच्या अचानक व अवेळी जाण्याने नाशिक मधील सायकलीस्ट समुदायाला झटका बसला आहे.

Jaspal singh virdi nashik cyclists

सायकलिंगच्या प्रचारासाठी प्रचंड परिश्रम करत असलेला सायकलिस्ट अशी जसपाल सिंग बिर्दी यांची ओळख होती. नाशिक-पंढरपूर सायकल वारीचे नियोजन, दिव्यांगांसाठीची सायकल राईड, राईड विथ ब्लाइन्ड्स, महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आयोजित केली जाणारी महिला रॅली असे अनेक सामाजिक उपक्रम, दिल्ली-मुंबई सायकल राईड असे अनेक उपक्रम त्यांनी नाशिक सायकलिस्टच्या माध्यमातून राबविले.

नाशिकमधील सायकलिस्टने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हावेत म्हणून त्यांनी ‘नर्चर द टॅलेंट’ हा उपक्रम चालू केला. यासह अनेक सायकलीस्ट उपक्रमांमध्ये जसपाल सिंग बिर्दी यांचा प्रत्यक्ष सहभाग होता.

जसपाल सिंग विर्दी यांच्या पश्चात आजोबा गुरुदेवसिंग विर्दी, वडील कुलजीत सिंग विर्दी, काका प्रीतपाल सिंग विर्दी, एक भाऊ, एक बहीण, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.