एस.टी. कर्मचारीवर्गाचा संप सूरु, बसेस डेपोत जमा, प्रवासी वर्गाचे हाल

  • एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा महामंडळाचा इशारा
  • सध्याकाळी ५ पर्यंत परत कामावर या अन्यथा तुमचे निलंबन करू – प्रशासन 
  • खासगी टूर्स  कंपन्या देत आहेत आपली सेवा  
  • आम्ही बोलण्यास तयार मात्र चांगला तोडगा हवा – आयटक चे अध्यक्ष छाजेड 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नाशिक मधून प्रतिसाद मिळत असून रस्त्यावर एकही एसटी धावताना दिसून येत नाहीये. तुरळक प्रमाणात शहर बस रस्त्यावर दिसून यवत असल्या तरी शहरातील तसेच जिल्हाभरात प्रवासासाठी निघालेल्या प्रवाश्यांचे मात्र यामुळे हाल होत आहेत. शहरातील ठक्कर बाजार, जुने एबीएस, महामार्ग बसस्थानकांवर प्रवाश्यांची गर्दी होती मात्र सर्व बसेस एकाच ठिकाणी थांबल्या असल्याचे दिसून आले. दुपारी मात्र सर्व बसस्थानकांवर शुकशुकाट दिसून येत असून काही प्रवासी दुसऱ्या पर्यायाने प्रवास करत आहेत. तर काहीही पर्याय नसलेले प्रवासी ताटकळत आहेत.

सर्व बसेस थांबल्या आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासन कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात येऊन सातवा वेतन आयोग लागू करावा, त्यांना पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी तसेच इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून संप पुकारण्यात आला असून आज (दि. १७) मध्यरात्रीपासून हा संप सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन देत जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र या निवेदनाला मुख्यमंत्र्यांनी केवळ समिती बसवून अहवाल येईपर्यंत थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या. गेल्या दीड वर्षांपासून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आश्वासन देऊनही याबाबत कोणताही निर्णय हिट नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

डेपोत लावलेल्या सर्व बसेस

दिवाकर रावते यांनी केले आंदोलन : 

दरम्यान कामगार व औद्योगिक न्यायालयाने संप चुकीचा ठरवला असून याबाबत कारवाई करण्याचा इशारा परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक रणजितसिंग देओल यांनी दिला आहे. तर प्रवासी हाच आपला दैवत असून ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाश्यांचे असे हाल हाऊ देऊ नका असे आवाहन करत संप मागे घेण्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे.

छाजेड हे कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत असून कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत महामंडळ सकारात्मक विचार करत आहे. त्यासोबतच सातवा वेतन आयोग लागू करणे केवळ अशक्य असून पुढील २५ वर्षे तो लागू होऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण महामंडळातर्फे देण्यात आले आहे.

या वादातून लवकरात लवकर तोडगा निघून प्रवाश्यांचे दिलासा मिळण्याची मागणी होत असून प्रवासी कर्मचाऱ्यांच्या मागणीबद्दल संवेदनशील दिसून आले आहेत. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाश्यांचा धीर सुटण्याआधी संप मागे घेतला जावा अशी आशा त्यांना आहे.

बस स्ट ॅड वर नागरिक आहेत मात्र बसेस नाहीत

खासगी बस सेवा एस टीचे दर :

यामध्ये प्रवासी वर्गाचे होत असलेले हाल पाहत आर.टी,ओ. ने मध्यस्थी करत चोधरी यात्रा कंपनी, बेनिवाल टूर्स इतरची मदत घेतली आहे. यामध्ये त्यांना विनती केली असून याच्या बससेवा त्यांनी दिल्या असून त्या बसच्या दरात प्रवासी वर्गाला सेवा देत आहे. यामध्ये चौधरी यात्रा कंपनीने जवळपास १०० बसेस उपलब्ध करवून दिल्या आहेत. यामध्ये मोठे मार्ग जसे पुणे, औरंगाबाद,कोल्हापूर मुंबईला वाहतूक सुरु असून नाशिकच्या अंतर्गत जिल्हा सेवा सुद्धा त्या देत आहेत. बेनिवाल टूर्स मध्ये मुंबई साठी बस सेवा सुरु केली असून जवळपास फक्त १०० रुपये आकारले आहेत. मात्र दुसरीकडे शहरा अंतर्गत वाहतूक महाग झाली असून यामध्ये प्रवासी वर्गाची जबर लुट करण्यात येत आहे.

तुमचे पैसे परत :

नागरिकांनी आगावू बुकिंग केले होते. तर पैसे सुद्धा भरले होते. त्यांना मात्र दिलासा असून त्यांचे पैसे त्यांना एस टी महामंडळ पुन्हा परत देणार आहे.

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.