Russia corona vaccine रशियात कोरोना विरुद्धची लस तयार करण्यात यश…

कोरोनाविरुद्धची लस बनवण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहे. मात्र रशियात कोरोना विरुद्धची लस तयार करण्यात यश आलं आहे.तसंच या लसची मानवी चाचणी देखील यशस्वी झाल्याचं म्हटलं जात आहे. जगात अमेरिकेत सगळ्यात जास्त रूग्ण आहेत तर ब्राझील दुसऱ्सा क्रमांकावर , भारत तिसऱ्या आणि रशिया चौथ्या क्रमांकावर आहे. जोवर कोरोनावर लस बाजारात येत नाही तोवर कोरोनाला अटकाव घालण शक्य नसल्याचं अनेकांनी म्हटलयं.या लसीसाठी जगभरीत प्रयत्न सुरू आहेत. आती रशियातून महत्वाची बातमी आली आहे. रशियाने कोरोनाविरुद्धच्या लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. रशियाच्या सेचोनोव युनिव्हर्सिटीने हा दावा केला आहे. या लसीची मानवी चाचणीही यशस्वी झाल्याचं युनिव्हर्सिटीने सांगितलं आहे.Russia corona vaccine

शियाने मात्र आपण कोरोनाविरुद्धची लस यशस्वीरित्या तयार केल्याचा दावा केला आहे. विद्यापीठाचे प्रमुख संशोधक इलिना स्मोलयारचुक यांनी म्हटलं आहे की ‘ही लस प्रभावी आहे.”संशोधन पूर्ण झाले असून ही लस सुरक्षित आहे असंही आढळलं आहे. भारतातील रशियन दुतावासाने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार युनिव्हर्सिटीने १८ जूनला गेमली इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी ऍण्ड मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या लसीचं परीक्षण सुरू केलं. सेचोनोव युनिव्हर्सिटीने पहिल्या लसीचं स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या परीक्षण केले आहे.सेचोनोव युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटोलॉजी, ट्रॉपिकल ऍण्ड वेक्टर-बॉर्न डिसीजचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव म्हणाले, आम्ही कोरोनाच्या लसीवर काम सुरू केलं आहे. चाचण्यांमधल्या स्वयंसेवकांच्या दुसऱ्या समुहाला २० जुलै रोजी डिस्चार्ज दिला जाईल.

या विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटॉलॉजी आणि ट्रॉपिकल तसंच व्हेक्टर बॉर्न डिसीजचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव यांनीही या लसीच्या मानवी चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. ही लस दिलेल्या वोलेंटीयरवर कसलाही विपरित परिणाम झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ही लस रुग्णांना देण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं.Russia corona vaccine

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.