कोसळलेल्या सुखोई ने केले शेतकऱ्यांचे १५.६५ कोटींचे नुकसान

नुकसानभरपाई अहवाला एच.ए.एल. कडे सादर

नाशिक : वायू सेनेचे लढाऊ विमान सुखोई ३० ची चाचणी करत असतांना निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात ते कोसळले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र विमान कोसळून सुमारे ७.३१ हे. क्षेत्राचे शेतीचे मोठे  नुकसान झाले आहे. या नुकसानीचे  पंचनामा आणि आर्थिक मोजमाप पूर्ण झाले आहे. नुकसान अहवालानुसार  १५ कोटी ६५ लाख रुपये इतकी किंमत आहे. तर सदरील पूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनने विमान निर्मिती करणारी कंपनी एचएएलकडे सादर केला आहे.Rs 15.65 crore loss farmers caused collapse Sukhoi nashik

अपघातामुळे संदीप ढोमसे, योगेश ढोमसे, विलास निकम, सुकदेव निफाडे या शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जेथे विमान पडले हा सर्व बागायती शेती परिसर आहे. भागात मोठ्याप्रमाणावर फळबागा आहेत. अपघातानंतर झालेल्या पिकांच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांनी केले. त्यानंतर कृषी विभागाने या नुकसानीचे मूल्यांकन करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला.

  • विलास निकम यांच्या २.३ हेक्टर डाळिंब बागेचे तब्बल ६ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान
  • योगश ढोमसे यांच्या १.३१ हेक्टर द्राक्षबागेचे ४ कोटी ५६ लाख रुपयांचे नुकसान
  • सुखदेव निफाडे यांच्या ०.६० हेक्टर द्राक्षबागेचे ४ कोटी ६१ लाख रुपयांचे नुकसान
  • वसंत जगताप, तानाजी ढोमसे, बाळनाथ पूरकर, अलका ढोमसे, संदीप ढोमसे, संजय ढिकले, विजय ढिकले, उमेश होलगडे, राजेंद्र रसाळ यांच्या शेतातील काकडी, टोमॅटो, मिरची, शेवगा पिकांचे ८ लाख ५ हजारांचे नुकसान

या दुर्घटनेत शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने या नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी आ. छगन भुजबळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

Rs 15.65 crore loss farmers caused collapse Sukhoi nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.