लासलगाव शहरात रोहिणी नक्षत्राचे दमदार आगमन! शेतकरी वर्गात आनंद

लासलगाव (वार्ताहर समीर पठाण) : जूनच्या पहिल्याच आठवड्यात लासलगाव ला  शनिवारी(२ जून) रोहिणी नक्षत्राचे आगमन झाले. लासलगाव शहरात दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाने एक तास जोरदार हजेरी लावली. rohini nakshatra begins heavy rain occured Lasalgaon thunderstorm nashik district

या वर्षीच्या मॉन्सूनच्या पावसाची लासलगावकर मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. शनिवारी (ता.२जून) लासलगाव शहरात सुमारे एक तास मान्सून बरसला.

उन्हाळ्यातील तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे लासलगाव चे नागरिक तीन महिने घामाघूम झाले होते. मात्र जून महिन्याच्या सुरवातीलाच नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ऊन-सावल्यांच्या खेळानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले. rohini nakshatra begins heavy rain occured Lasalgaon thunderstorm nashik district

सकाळी कडक उन्हामुळे लासलगाव व परिसरातील नागरिक घामाघूम होत असतानाच दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरवात झाली. पावसाची गरज असल्याने शेतकरी व व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून आले.

लासलगाव व परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास दमदार पावसाच्या सरी पडल्यामुळे सोयाबीन, मका, भुईमूग आदी रोपांना लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

तसेच वरुण राजा बरसल्यामुळे आता खते बी बियांच्या दुकानात शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे तर शेतीच्या कामांची लगबग सुरु होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

rohini nakshatra begins heavy rain occured Lasalgaon thunderstorm nashik district
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.