Road Accident कारने दिली टँकरला धडक, महिलेचे शीर वेगळे, दोन ठार

मुंबई आग्रा महामार्गावर आज एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात राजस्थान येथील जोधपुर आर टी यो मध्ये  नोंदणी कृत असलेल्या कारने भयानक वेगात येत सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शहापूर तालुक्यातील आसनगाव जवळील  हॉटेल परिवार गार्डन समोर मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या एका गॅस टँकरला पाठीमागून धडक दिली आहे. Road Accident

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये कार क्रमांक RJ.19.TA.8005 ने टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली होती.

हा अपघात इतका भयानक होता की, या कारमधील एका महिलेचे शीरच  धडावेगळे झाले आणि कारच्या मागील बाजूस डिक्कीच्या काचेला अडकून पडले होते. या वरुन समजते की ही कार किती भयानक वेगात असली पाहिजे.

या अपघातात कारचालकाने डुलकी आल्‍याने त्‍याचे कारवरील नियंत्रण सुटले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. कार सरळ गॅस टँकरला पाठी मागून धडकली. हा अपघात इतका भयानक होता की, कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. या घटनेचा पुढील तपास शहापूर पोलिस करीत आहेत. ही राजस्थान येथे नोंदणीकृत असून ती राजू सिंग यांच्या नावे होती इतकीच माहिती उपलब्ध होऊ शकली आहे. Road Accident

Watch Trailer Girlz बंदिस्त पिंजरा तोडून ‘गर्ल्स’ आल्या सर्वांसमोर Video

राष्ट्रपती राजवट आणि त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या!
Read :- President’s rule राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.