तेजीतील कांदा भाव अखेर कोसळले, शेतकरी संतप्त

कांदा भाव कोसळले, लिलाव बंद शेतकरी आक्रमक

नाशिक : सटाना बाजार समितीत होत असल्या उन्हाळी कांदा लिलाव बंद पडला आहे. कांदा भाव कोसळला म्हणून शेतकरी आक्रमक झाला आहे.  यामध्ये प्रती क्विटल साडे तीन हजारांचा भाव पार केला होता. मात्र सरकारने कांदा व्यापारी वर्गावर कांदा साठवणूक बंदी केली आणि भाव लगेच एक हजार ते बाराशे रुपयांनी पडले आहे.

संतप्त शेतकर्‍यानी आज गुरुवारी सटाणा येथील बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर आंदोलन केले आहे. यामध्ये बाजार समितीचे सभापती रमेश देवरे ,सचिव भास्करराव तांबे यांनी शेतकर्‍याच्या भावना समजून घेत दिवाळीमुळे व्यापार्‍याकडे मजुरांची टंचाई असल्यामुळे खरेदी केलेल्या कांद्याची विल्हेवाट लावता येत नाही असे कारण सांगितले आहे.

तर कांदा खरेदी ही साठवणूक दिसेल यामुळे कांद्याचे भाव कोसळत असल्याचे निदर्शनास त्यांनी सांगितले आहे.या नंतर शेतकरी वर्गाने तासाभराने  आंदोलन मागे घेतले. सुमारे दोन तासानंतर कांद्याचे लिलाव पुर्ववत होऊ शकले आहेत .

खरीप कांद्याच्या उत्पादनात मोठी  घट झाली आहे. यामुळे उन्हाळ कांद्याला मोठ्या प्रमाणात  मागणी वाढल्यामुळे भावात जोरदार वाढले होते. मात्र दिवाळी नंतर उन्हाळ कांद्याची आवक वाढत असली तरी भावात मात्र गेल्या तीन दिवसांपासून तेजी राहिली आहे.

तीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर शासनाने पुन्हा व्यापार्यांच्या साठेबाजीवर मर्यादा आणली आहे.  यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे भाव नियंत्रणात आणता येतील असा प्रयत्न केला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.