पोलिस आयुक्तालय परिसरात प्रतिबंधात्मक शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश  जारी

Share this with your friends and family

पोलिस आयुक्तालय परिसरात शस्त्रबंदी जमावबंदी आदेश Restrictions prohibition ban order Police Commissionerate area city

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  30 एप्रिल 2018 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र  व जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे पोलिस उप आयुक्त विशेष शाखा विजयकुमार मगर यांनी  कळविले आहे.Restrictions prohibition ban order Police Commissionerate area city

शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिस उप आयुक्त विशेष शाखा विजयकुमार मगर यांनी  30 एप्रिल 2018 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 36 अन्वये शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांना नाशिक पोलीस आयुक्तालय लेखी  व तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

या कालावधीत आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावरील जाणाऱ्या मिरवणुकीतील व्यक्तिंचे वागणे, बिभत्स व अश्लिल हावभाव अथवा कृत्याबाबत आदेश देणे, ज्यामार्गाने मिरवणुक किंवा जमाव जाईल अथवा जाणार नाही ती वेळ निश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी वापरावयाच्या लाऊड स्पिकरची वेळ, पद्धती, ध्वनीची तिव्रता, आवाजाची दिशा नियंत्रण करणे, रस्त्यावर – सार्वजनिक जागेवर गाणी, संगीत ड्रम्स, ताशे, ढोल किंवा इतर वाद्ये, हॉर्न वाजवणे किंवा कर्कश आवाज करण्यावर नियंत्रण ठेवणेसाठी हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 134 नुसार शिक्षेस पात्र राहील.

Restrictions prohibition ban order Police Commissionerate area city

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.