धोकादायक वृक्ष हटविण्याची भाजपाची मागणी

नाशिक: दि.29 मे 2019 रोजी सहदेवनगर गंगापुर रोड प्रभाग क्र.7 मधील 26 वर्षांचा युवक अभिजित शिंदे हयांचा झाडावर गाडी आपटून दुर्देवी अंत झाला.सदर वृक्ष शांतिनिकेतन सोसायटी ते होरायझन स्कुल मधील रस्त्यावर मधोमध असा आहे.

          त्या संदर्भात आज भाजपा मध्य-पश्चिम मंडलातर्फे माननीय आयुक्त साहेबांना आज निवेदन देण्यात आले. हया निवेदनात प्रभाग क्र.7मधील रस्त्यांच्या मधोमध असणारे वृक्ष तसेच शहरातील अन्य ठिकाणी असलेले वृक्ष कापून टाकण्याबाबत निवेदन देण्यात आले. तसेच स्थायी समिती माजी सभापती हिमगौरी आहेर आडके, नगरसेवक योगेश (मुन्ना)हिरे यांचेही लेखी निवेदन देण्यात आले. जेनेकरुन अपघाती वृक्षामुळे होणारे अपघात व  माणसांचे मृत्यु थांबतील या निवेदनामार्फत सांगण्यात आले.

           याप्रसंगी मध्य-पश्चिम मंडलाचे अध्यक्ष देवदत्त जोशी, नगरसेविका स्वाती भामरे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, भाजपाचे मार्गदर्शक निवास मोरे, शरदचंद्र नामपुरकर, राजेश आहेर,  तुषार जगताप, सोनल दगडे, धनंजय माने, नितीन शिरोडे, पुजा शिरोडे, पुजा सोनवणे, सुरेखा अहिरे तसेच परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.