Rehana Fathima अर्धनग्न होत रेहाना फातिमाने स्वत:च्या मुलांना करू दिले ‘बॉडी पेंटिंग’

कोट्टयम : केरळच्या शबरीमालामध्ये अयप्पा मंदिर प्रवेश प्रकरणी चर्चेत आलेली महिला कार्यकर्ती रेहाना फातिमा पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. तिने शेअर केलेल्या अर्धनग्न व्हिडीओमुळे पुन्हा एकदा फातिमाचंं नाव चर्चेत आले आहे. तिने तिच्या मुलांसमोर अर्धनग्न होत त्यांना स्वत:च्या शरिरावर पेंटिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे रेहाना विरोधात थिरुवल्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे. पोलिसांनी सेक्शन आयटी कायद्याच्या 67 अंतर्गत (इलेक्ट्रॉनिक मार्गाने लैंगिक कंटेट प्रसिद्ध करणे) आणि जुवेनाइल जस्टिस कायद्याच्या सेक्शन 75 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.Rehana Fathima


रेहाना फातिमाने हा व्हिडीओ शेअर करताना ‘बॉडी आर्ट आणि राजकारण’ असं कॅप्शन दिले आहे. यामध्ये तिची दोन्ही मुलं तिच्या अर्धनग्न शरिरावर पेंटिंग करत आहेत. पोस्टबाबत फातिमाचे असे म्हणणे आहे की, लैंगिकतेच्या चुकीच्या संकल्पनेविरोधात तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
तिने या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, ‘जेव्हा त्यांची आई डोळ्याच्या समस्येमुळे काहीसा आराम करत होती, त्यावेळी तिच्या मुलांनी तिला Cool बनवण्याठी फिनिक्स पक्षाचे पेंटिग करण्याचा निर्णय घेतला.’ सध्याच्या समाजात महिला कपड्यांमध्ये देखील सुरक्षित नाही आहेत. एखाद्या स्त्रीचे शरीर काय आहे किंवा लैंगिकता काय आहे याबाबत उघडपणे बोलले पाहिजे असे म्हणणे रेहानाने या व्हिडीओतून मांडले आहे.

ती पुढे म्हणाली की, लैंगिकतेबाबत चुकीच्या संकल्पनांविरोधात घरापासूनच सुरुवात झाली तर बदल होऊ शकतो. दरम्यान रेहानाच्या हा व्हिडीओवर खूप टीका केली जात आहे. मात्र काही अंशी तिच्या पोस्टचे कौतुक देखील होत आहे.Rehana Fathima

Woman activist Rehana Fathima has bared half her body for her kids to paint beautiful pictures on it. In a bizarre video posted with the caption ‘Body art and politics’, she can be seen lying down on bed half-naked and her two kids painting colorful pictures on her body.In the post, she says that it is the video released against fake moral consciousness and wrong concept about sexuality”When mother is taking rest due to some eye problem, her kids are painting the picture of Phoenix bird in order to make her cool,” goes the description of the video.

Rehana Fathima says that in this sexually frustrated society, a woman is not safe merely in her dresses. “We have to speak out and expose what a woman’s body is and what sexuality is. We can bring change to society only if it begins from home.Her video has drawn criticism from several quarters, though a few have come out in support of her.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.