पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह  बँक अडचणीत, खातेधारक हतबल , बँक परिसरात तणाव

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेवर  रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे बँक मोठ्या  अडचणीत सापडली आहे. त्यामुळे बँकेच्या बाहेर आज खातेधारक हतबलपणे उभे राहिले होते. त्यांना फक्त खात्यातून एक हजार काढण्याची मुभा असल्याने अनेक तणावात असल्याचे दिसून आले. यावेळी शरणपूर रोडवरील बँकेच्या परिसरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दिली होती.


आरबीआयच्या निर्बंधामुळे बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा आल्याने ग्राहकांनी बँके च्या शरणपूररोडवरील शाखेत सकाळी बँक उघडल्यापासूूनच मोट्या प्रमाणात  गर्दी केली. यात काही महिलांनी आपल्या हक्काचे आणि कष्टाचे पैसे मिळावे म्हणून लहानमुलांना सोबत घेऊन खात्यामधून पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र  शाखा व्यवस्थापकांनी एका ग्राहकाला केवळ एक हजार रुपयेच देण्याची तयारी दर्शविल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला होता.  खात्यातून अधिक प्रमाणात  पैसे काढण्याचा आग्रह धरल्याने बँकेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याने  पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
 
पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी (दि.२४) निर्बंध लादल्याने बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी बँकेच्या स्थितीची जबाबदारी स्वीकारत ग्राहकांना सहा महिन्यांत ही परिस्थिती सुधारण्याविषयी आश्वासिन दिले आहे. मात्र दुसरीकडे  ग्राहकांमध्ये बँक बंद होणार, आपले पैसे बुडणार या भीतीने बँकेच्या शरणपूररोडवरील शाखेत ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी प्रचंड गर्दी  केली होती.

सोबतच  शाखा व्यवस्थापक आणि कर्मचाºयांना जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे बँकेत गोंधळ निर्माण झाला आणि बँक प्रशानाने पोलिसांना कळवले व संरक्षण मागितले होते.  बँकेने रोख रकमेसोबतच इसीएस आणि एटीएमद्वारे पैसे काढण्याची प्रक्रियाही बंद केल्याने ग्राहकांच्या अडचणीत आणखीनत भर पडली आहे.   काही ग्राहकांनी एफ डी स्वरूपात बँकेत लाखो रुपये ठेवले आहेत, तर अनेकांचे बचत खाते बँकेत आहेत. त्यामुळे इतके सारे पैसे गुंतवले व येणार सण, लग्न कार्य यामध्ये पैसे मिळणार नाही म्हणून खातेदाराक हतबल व संताप व्यक्त करत होते. 

Join Our Whats App Group

शहरातील घडणाऱ्या घटना किंवा तुमच्या सोबत निगडीत  एखाद्या    गोष्टीला प्रसिद्धी द्यायची असेल, प्रसिद्धीपत्रक , प्रेस नोट इत्यादी आमच्या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध करायचे असेल तर 9689754878 या क्रमांकावर तुम्ही व्हॉटस अप करू शकता सोबतच नाशिकच्या बातम्या तुम्हाला रोज हव्या असतील तर तुम्ही 9689754878 या क्रमांकर Join News  असे लिहून तुमचे नाव पाठवा सोबतच हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव करा.  

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.