दानवेंचा अनोखा सत्कार टळला; सुकाणुच्या सदस्यांना अटक

नाशिक महापालिकेच्या विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी नाशिक दौ-यावर आलेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आले आहेत. यानिमित्ताने शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने आखलेल्या अनोखा सत्कार करण्याचे मनसुबे आखले होते. मात्र पोलिसांनी घटना घडण्याच्या आधीच या सदस्यांना अटक केल्याने हे मनसुबे उधळले गेले.

आज (दि. २५) सकाळीच शासकीय विश्रामगृहावर सुकाणूचे सदस्य पोचले होते. यावेळी सताधारी पक्षाविरुद्ध घोषणा केल्याने पोलिसांनी त्यांना अटक करत विश्रामगृहाबाहेर हलविले. दानवे संध्याकाळपर्यंत नाशिक मध्ये असल्याने तोपर्यंत या सदस्यांची सुटका शक्य नसून कुठल्याही प्रकारे हा प्रकार थांबवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

अटक केल्यानंतर सुकाणू समितीच्या सदस्यांनी दानवेंचा सत्कार करण्यासाठी आणलेले साहित्य म्हणजेच काळी शाल, बेशरमचे फुल, काळे कपडे हे प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत.

केंद्र व राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार असलेले रावसाहेब दानवे हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दानवे यांनी तूर खरेदी संदर्भात शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या अवमानकारक शब्द प्रयोगाने वाद झाला होता. साले म्हणून संबोधित केलेल्या शेतकऱ्यांचे रावसाहेब दानवे मेहुणे ठरल्याने त्यांचा मान सन्मान करून सत्कार करण्याबाबतचे पत्रक शेतकऱ्यांच्या संघटनांची सुकाणू समितीने काल (दि.२४) रोजी एक पत्रक काढून पाहुण्यांना वारकरी संप्रदायाचे प्रतिक असलेला बुक्का लावून औक्षण केले जाणार होते. तसेच काळी शााल, काळे कपडे देवून सत्कार करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले होते.

  • साले म्हणून संबोधित केलेले शेतकरी सुकाणू समिती जिजा रावसाहेब दानवे याचा सत्कार करणार होते.
  • जावई अतिथी म्हणून येणार असतील त्यांचा विशेष सन्मान करणे महाराष्ट्राचा शेतकरी आपले कर्तव्य समजत असल्याची कोपरखळी.
  • नाशिकच्या दौ-यावर येत असलेले प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा परंपरेशी बांधिलकी ठेवूनच विशेष सत्कार आयोजित केला होता.
  • वारकरी संप्रदायाचे प्रतिक असलेला बुक्का लावून औक्षण केले जाणार आहे, तसेच काळी शाल, काळे कपडे देवून सत्कार करण्यात येणार होता.

ravsaheb danve satkar sukanu samiti members at nashik rest house

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.