रावण दहनाला विरोध करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा :

वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्रची निवेदनाद्वार जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नाशिक : रावण हा आदिवासी समाजाचा मूळ अथवा प्रेरणापुरुष असून अन्य गैर आदिवासी समाज हा रावणाचे दहन करून आदिवासी समाजाला अपमानित करत असल्याचा भ्रामक प्रचार करून भारत देशात शतकांनुशतके एकोप्याने नांदत असलेल्या या समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही संघटना आणि संस्था करीत असल्याचा निषेध नोंदवत वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र या संस्थेने रावण दहनाला विरोष करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नाशिकच्या जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ravan dahan tribals protest vanvasi kalyan ashram meets nashik collector

यावेळी वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्रचे प्रांत संघटन मंत्री जयराम चौधरी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सचिव शरद शेळके, जिल्हा संघटन मंत्री नाना देवरे, सहसचिव प्रशांत पाटील, जनजाती संपर्क प्रमुख भास्कर खांडवी, योगेश शिंदे आदी उपस्थित होते.

दसरा आणि नवरात्रोत्सव आणि त्यानिमित्त निर्माण झालेली रावण दहन परंपरा ही अनेक वर्षापासून भारतवर्षात सुरु आहे. समाजातील दुष्कृत्य करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करून सज्जन शक्तींना प्रोत्साहन देण्याची संकल्पना असल्याचे वनवासी संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ravan dahan tribals protest vanvasi kalyan ashram meets nashik collector

नाशिक शहरात गोदावरी किनारी रामघाटावर या निमित्ताने समाजातील सर्व घटक एकत्रित येऊन सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवतात. आता मात्र यामध्ये काही संघटनांनी जनजाती परंपरा, वारसा अथवा मूळपुरुष यांचा खोटा संदर्भ देत वैचारिक, धार्मिक आणि सामाजिक भेद निर्माण करण्याचा खेदजनक प्रकार करत या परंपरेला विरोध केला असल्याचे संस्थेने निवेदनात म्हटले आहे. आपल्या समाजात या परंपरेचा विरोध करण्याचा प्रचार या संघटना करत आहेत.

विविधतेचा एकतेचे दर्शन घडवणाऱ्या या भारत देशात रावण दहन उत्सव हा दुर्जन प्रवृत्तींवर सज्जनांचा विजय अशी व्यापक व शुद्ध संकल्पना या रावण दहन उत्सवामध्ये आहे. देशातील अनुसूचित जमाती अर्थात वनवासी ऐतिहासिक काळापासून या देशात दुर्जन शक्तींशी लढत आल्याच्या भावनेतून प्रतीकात्मक रावण दहन परंपरा जनजाती क्षेत्रात होते असा दावाही वनवासी संस्थेने केला आहे. ravan dahan tribals protest vanvasi kalyan ashram meets nashik collector

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वनवासींसाठी गेल्या 66 वर्षापासून कार्यरत असलेल्या वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांवर स्थानिक संघटनांकडून द्वेषाच्या भावनेतून दमदाटी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच आता नाशिकमध्ये गोदावरी किनारी रामघाटावर होणाऱ्या रावण दहनास काही संस्थांनी विरोध केला आहे.

ravan dahan tribals protest vanvasi kalyan ashram meets nashik collector
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.