नाशिक अग्निशमन दलाच्या सात जवानांना राष्ट्रपती पदक

नाशिक : गतवर्षी जुलै महिन्यात गोदावरीसह कादावा नदीला आलेल्या महापुरात स्वत:चे प्राण धोक्यात घालून नऊ नागरिकांना सुखरुपरीत्या बाहेर काढणार्‍या महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील सात कर्मचार्‍यांची राष्ट्रपती शौर्य पदकासाठी निवड झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला राष्ट्रपती कार्यालयाकडून पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

महापालिकेतील सात जणांना एकाच वेळी राष्ट्रपती पदक प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ असून हा मान नाशिक महापालिकेला मिळाला आहे.

अग्निशमन दलातील उपअधिकारी दीपक गायकवाड, वाहनचालक देविदास इंगळे, फायरमन शिवाजी खुळगे, शिवाजी फुगट, हेमंत बेळगांवकर, बाळासाहेब लहांगे, अविनाश सोनवणे अशी राष्ट्रपती पदक विजेत्यांची नावे आहेत.

 

दोघा पोलिस अधिकाऱ्याचा सन्मान : कड,सय्यद यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “नाशिक अग्निशमन दलाच्या सात जवानांना राष्ट्रपती पदक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.