परप्रांतीयाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार,केले तिला गरोदर

जुने नाशिक भागात संतापजनक प्रकार समोर आला आहे. युपी येथील परप्रांतीयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. मुलगी ही मुळची हिंगोली येथील रहिवासी आहे. मजुरीसाठी तिचा परिवार नाशिक येथे स्थायिक झाले आहेत. भद्रकाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवला आहे.

अधिक महिती अशी की मार्च २०१७ मध्ये संशयित उत्तर प्रदेश येथील रहिवासी दिलीपकुमार उर्फ कुंदनकुमार श्रीखनजी साहनी याने मुलीला सकाळी जाताना अडवून तिच्च्यावर बळजबरी करत बलात्कार केला होता. नंतर त्याने वेळोवेळी चाकूचा धाक दाखवत तर कधी तिच्या आई बापाला मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार सुरु ठेवले होते.भद्रकाली परिसरात असलेल्या जयशंकर गार्डन येथे एका साईटवर हे सर्व काम करत आहेत.

मात्र मुलीची बदलती तब्येत पाहता तिच्या आईला सर्व प्रकार लक्षात आला , तिने विचारपूस केली असता हा सर्व प्रकार मुलीने कथन केला आहे. यामध्ये तिने आणि तिच्या आईने लगेच भद्रकाली पोलिस स्टेशन गाठले व फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहे. या घटनेची सखोल चौकशी महिला उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.