किल्ले रामशेज देखरेखीसाठी शिवकार्य संस्थेला दत्तक द्यावा, खा. छत्रपतींकडे मागणी

किल्ले रामशेज हा नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक अजिंक्य लढ्याचे प्रतीक आहे. कमी उंचीचा अभेद्य कातळ कड्याचा असा हा किल्ला आहे. नाशिक पासून अवघ्या १२ किमी अंतरावर असलेल्या या किल्ले रामशेजवर आज खा. छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी भेट दिली. ramshej fort adoption maintenance shivkarya gadkot sanvardhan sanstha chhatrapati sambhaji

जिल्ह्यातील गडकोटांच्या संवर्धनात 7 वर्षे अथक परिश्रम करणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या कार्कार्त्यांनी यावेळी छात्रापातीन्सोबत किल्ला सर केला. संस्थेच्या किल्ले मोहिमेची माहिती संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी दिली. तर इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांनी किल्ल्याची भौगोलिक ऐतिहासिक माहिती खा. भोसले यांना दिली.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने खा. संभाजी राजे यांना किल्ल्यावर सविस्तर निवेदन व गडकोट पुस्तिका देण्यात आली. यावेळी राम खुर्दळ यांनी त्यांना जिल्ह्यातील एकूण किल्ल्यांची वाताहत संगीतली. किल्ल्यांची उपेक्षा, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी हेरिटेज समिती व्हावी, रामशेजच्या कामात आधी झालेला 1 कोटी 80 लाखाच्या कामातील गैरप्रकार बघता यापुढे येणाऱ्या निधीचे कामकाज पारदर्शक व्हावे अशी मागणी यावेळी खासदारांकडे करण्यात आली. ramshej fort adoption maintenance shivkarya gadkot sanvardhan sanstha chhatrapati sambhaji

यासाठी रामशेज वर अजिंक्य लढ्याचे स्मारक, पडलेल्या अवस्थेत असलेले टेहळणी बुरुजांचे कामकाज व्हावे तसेच किल्ला शिवकार्य संस्थेला देखरेखीसाठी दत्तक द्यावा अश्या मागण्या करण्यात आल्या.

दुर्गसंवर्धन कार्याला सरकार कुठलेही सहकार्य करीत नाही. शिवकार्य गडकोटने 7 वर्षात नाशिक जिल्ह्यातील 59 किल्ले श्रमदान मोहीम केल्यात. किल्ले रामशेजवर गेल्या 4 वर्षे 14 मे दरम्यान किल्ले रामशेज महोत्सव संस्था करते. या किल्ल्याचे संवर्धन व्हावे, किल्ल्यावरील अजिंक्य लढा समाजातील तळागाळात पोहोचवा म्हणून संस्था अथक प्रयत्न करीत आहे.

हा किल्ला शिवकार्यला दत्तक मिळावा म्हणून ही शासनाला पत्रव्यवहार केला असून इतिहास अभ्यासक गिरीश टकले, हातगड किल्ल्याचे शिवकालीन किल्लेदार गंगाजी देशमुख मोरे यांचे सध्याचे वंशकज मनोहर मोरे देशमुख यांनी महाताजांची भेट घेतली निवेदन दिले.

शिवकार्यचे निमंत्रक सोमनाथ मुठाळ संयोजक योगेश कापसे,शाम मोरे यावेळी सोबत होते.

ramshej fort adoption maintenance shivkarya gadkot sanvardhan sanstha chhatrapati sambhaji

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “किल्ले रामशेज देखरेखीसाठी शिवकार्य संस्थेला दत्तक द्यावा, खा. छत्रपतींकडे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.