पंचवटी : श्री राम जन्म उत्सव आनंदात साजरा

राज्यासह देशभरात आज उत्साहात रामनवमी साजरी करण्यात येत आहे.गुढीपाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाला सुरूवात होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जवळजवळ आठवडाभर रामजन्मोत्सव साजरा केला जातो.नाशिकमधील पंचवटीला अनेक भाविक यानिमित्तानं भेट देतात.दंडकारण्याच्या भागात प्रभूरामचंद्रांनी तब्बल 14 हजार राक्षसांचा वध केल्याची आख्यायिका आहे. रावणाची बहिण शुर्पणखा हिचं नाक कापल्याची घटनाही याच भागात घडल्याचं म्हटलं जातं.पेशव्यांनी 1790मध्ये पंचटवटी भागात काळाराम मंदिर बांधून त्यांच्या स्मृतींचं जतन करण्यासाठी हे धर्मक्षेत्र तयार केलं. रामनवमीच्या निमित्ताने पंचवटीचा परिसर पुन्हा भक्तीमय वातावरणात न्हाऊन गेलेला पाहायला मिळतो आहे.तर आज पालक मंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी,आमदार बाळासाहेब सानप यांनी राम जन्म उत्सवाला   हजेरी लावली आहे.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *