राजधानी एक्स्प्रेसचे नागरिकांनी केले जोरदार स्वागत

नाशिक-अहमदनगर-औरंगाबाद-जळगाव-भुसावळ-धुळे नागरिकांना  फायदा

नाशिक : मध्ये रेल्वेवर सुरु केलेल्या नवीन राजधानी एक्स्प्रेसचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सायंकाळी आगमन झाले. यावेळी नाशिककरांनी जोरदार स्वागत केले आहे. खासदार हेमंत गोडसे  व अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते पूजन रेल्वेचे पूजन केले गेले.

मुंबई- नाशिक-दिल्ली असा प्रवास असणारी राजधानी एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस नाशिकमार्गे धावणार आहे. ठाणे भुसावळ दरम्यानच्या प्रवाशांसाठी या गाडीचा मोठा उपयोग होणार असून वेळ पैशाची बचत होणार आहे.होताच राजधानी एक्स्प्रेस मुंबई-विरार मार्गे गुजरातकडे न जाता ती मुंबई-कल्याण-ठाणे- इगतपुरी-नाशिकरोड-मनमाड-जळगाव-भुसावळ मार्गे दिल्लीकडे धावेल. त्याचा दिल्ली प्रवास करणाऱ्या उत्तर महाराष्टÑातील प्रवाशांना व उद्योग, व्यवसायाला फायदा होणार आहे.

नाशिक-अहमदनगर-औरंगाबाद-जळगाव-भुसावळ-धुळे येथील रेल्वे प्रवाशांना दिल्ली येथे जाण्यासाठी मुंबई येथून राजधानी पकडावी लागते. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होते. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईहून दिल्लीला जाणारी अतिवेगवान राजधानी एक्स्प्रेस पश्चिम मार्गाऐवजी मध्यमार्गावरून धावावी यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते.

या संदर्भात त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच पीयूष गोयल यांची भेट घेऊन राजधानी एक्स्प्रेस मध्य रेल्वे मार्गावरून सुरू करणे किती गरजेचे आहे तसेच दिल्लीला जाण्यासाठी अतिवेगवान रेल्वे गाड्या उपलब्ध नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते.या गाडीच्या स्वागत प्रसंगी आ. योगेश घोलप, स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण आदींसह रेल्वे सल्लागार समिती व प्रवाशी संघटनांचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.