राज्य मराठी पत्रकार संघाकडून ५०० वारकऱ्यांना रेनकोट वाटप

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातील वारकरी मार्गस्थ झाले आहेत. पायी दिंड्यांचे शहरासह जिल्हाभरात ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संंघटक संजय भोकरे, राज्य अध्यक्ष राजा माने कार्यध्यक्ष वसंत मुंढे, नामंवत उद्योजक सचिनजी लबडे यांच्या कल्पनेतून उपक्रम सुरु करण्यात येऊन येथे वारकऱ्यांचे स्वागत करून ५०० वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. Raincoat distribution varkari devotees ahamadnagar marathi rajya patrakar sangh

Raincoat distribution varkari devotees ahamadnagar marathi rajya patrakar sangh

मजल दरमजल करीत पंढरीच्या दिशेने हजारो दिंड्यांनी प्रस्थांन ठेवले आहे. श्रीरामपूरसह जिल्ह्याच्या उत्तर भागासह नाशिक जिल्ह्यातील बहुतेक दिंड्या नगर-मनमाड मार्गे नगर शहरातून जातात. त्यात अडबंगनाथ महाराज, अगस्ती ऋषीजी महाराज, महिपती महाराज आदी दिंड्या पंढरपुरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या प्रवासात ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता बालकांस वृद्ध वारकरी भक्तीभावाने मार्गक्रमण करत आहेत. Raincoat distribution varkari devotees ahamadnagar marathi rajya patrakar sangh

राहुरी तालुक्यातील नांदगाव येथे नगर-मनमाड मार्गावर सकाळच्या नाष्ट्यासाठी श्री क्षेत्र अगस्ती ऋषीजी महाराज पालखी दिंडी थांबली होती. त्यावेळी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या हस्ते वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ, दिंडीचे अध्यक्ष राजेंद्र महाराज नवले, देवस्थान विश्वस्त दीपक महाराज देशमुख, संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पत्रकार दीपक कांबळे, तालुकाध्यक्ष गीताराम शेटे, तालुका कार्याध्यक्ष बंडू म्हसे, सुनील भुजाडी, अगस्ती साखर कारखान्याचे माजी संचालक अॅड. शांताराम वाळूंज, अण्णासाहेब चौधरी,अरुण माळवे आदी उपस्थित होते.

या प्रसंगी आरोटे म्हणाले की, मी वारकरी कुटंबातीलच आहे. या समाजाचे पत्रकार म्हणून आपणही देणे लागतो या हेतुने पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. सोलापूर जिल्ह्यातही संघाच्यावतीने सर्व वारकऱ्यांना विविध साहित्याचे वाटप केले जाते, दरवर्षी हा उपक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार संघाने राबवलेल्या उपक्रमाचे वारकऱ्यांनी कौतूक केले.

Raincoat distribution varkari devotees ahamadnagar marathi rajya patrakar sangh
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.