पी व्ही सिंधूने जिंकले रौप्य पदक

सिंधू ठरली ऑलिम्पिक रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला

रिओ डी जेनेरिओ – रिओ ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूने भारतासाठी रौप्य पदक जिंकले असून सिंधूने काल जपानच्या नोझोमी ओकुहाराचा २१-१९, २१-१० असा धुव्वा उडवून बॅडमिंटनमधल्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारली होती. आज तिची गाठ स्पेनच्या कॅरोलिना मरिनसोबत पडली.

अत्यंत चुरशीच्या सामन्यात पीव्ही सिंधूने पहिला गेम २१-१९ असा जिंकला तर कॅरोलिना मरिनने दुसरा गेम २१-१२ असा जिंकत बरोबरी साधली. अखेर शेवटचा गेम कॅरोलिना मरिनने १५-२१ असा जिंकत ऑलिम्पिकचे सुर्वण पदक पटकवले. सिंधूच्या या कामगिरीमुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आता एक रौप्यपदक जमा झाले आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकच्या इतिहासात रौप्य पदक जिंकणारी सिंधू ही भारताची पहिली बॅडमिंटनपटू ठरली आहे.

tmp_31656-IMG-20160819-WA00261134891652

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.