शनिवारी पूणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन

नाशिक : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि.20 जुलै) पुणे ते बारामती ही राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीया आणि सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि क्रीडा जागृती या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सायकलपटूंनी १८ जुलैपर्यंत आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे सचिव संजय साठे यांनी केले आहे. Pune Baramati Cycle Race Nashik Entry Invitation

या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आजवर दरवर्षी महाराष्ट्रासह तेरा राज्यातील सुमारे पाचशेहुन जास्त राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी होत असतात. नाशिकच्या अनेक सायकलपटूंनी ही स्पर्धा गाजवली आहे.

पुरुषांसाठी राष्ट्रीय स्तरावरील पुणे बारामती (122 किमी), पुरुषांसाठी राज्यस्तरावरील पुणे बारामती (122 किमी), पुरुषांसाठी एमटीबी/हायब्रीड सायकलवर राज्यस्तरीय सासवड ते बारामती (85 किमी), तसेच महिलांसाठी राष्ट्रीय स्तरीय माळेगाव ते बारामती (15 किमी) अशा चार गटांत ही स्पर्धा रंगणार आहे.

तरी जिल्ह्यातील इच्छूकांनी आज 18 जुलै पर्यंत नाशिक जिल्हा सायकलिंग असो.चे सचिव नितीन नागरे (मो. 9822291551) किंवा योगेश टिळे (8329910685) यांच्याशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Pune Baramati Cycle Race Nashik Entry Invitation

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “शनिवारी पूणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.