मराठीतील ‘पासवर्ड हॅकिंग टेक्नीक्स व सिक्युरीटी’ चे पोलिस आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

निलेश दळवी लिखित मराठीतील पासवर्ड हॅकिंग टेक्नीक्स व सिक्युरीटीचे प्रकाशन

बँक खाते, सोशल मिडीया वापरतांना जागरूक रहा  नाशिक पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांचे प्रतिपादन

नाशिक : दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर वाढत आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक अगदी सहजपणे इंटरनेट वापरतात. मात्र हा वापर करत असतांना जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. जसे आपण शहराचे नागरिक सिटीझन असतो तसे नेट वापरणारे नेटीझन्स आहेत. अनेकदा आर्थिक नुकसान, सोशल मिडीयातून नाते तयार करत फसवणूक, मानसिक त्रास देणे, अश्लील फोटो तयार करणे आदी यातून निर्माण होतात. लोकांना इंटरनेट सुयोग्य वापर माहित नाही. हाताळण्याचे पुरेसे ज्ञान नाही. यावर मार्ग काढण्यासाठी ‘पासवर्ड हॅकिंग टेक्नीक्स व सिक्युरीटी’ सारख्या पुस्तकाचा नक्की उपयोग होईल असे मत नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी व्यक्त केले आहे.

नाशिकच्या इन्फिनिटी आय.टी.चे संचालक निलेश दळवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन सिंघल यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. ‘पासवर्ड हॅकिंग टेक्नीक्स व सिक्युरीटी’ हे मराठी भाषेत लिहिलेले पुस्तक असून, सर्व तांत्रिक मुद्दे लेखकाने सोप्या पद्धतीने समाजावले आहेत.

गेल्या काही वर्षात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नाशिक साबर पोलिसांनी या गुन्ह्यांचा अभ्यास केला असता बहुतांश वेळेला लोक इंटरनेटचा वापर करतांना काळजी घेत नाही. अनेकदा सांगूनही ओटीपी नंबर, कार्ड नंबर, पासवर्ड इतरांना देतात. पुढे त्यातून गुन्हा घडतो. तेव्हा  इंटरनेटचा वापर करण्याआधी सुरक्षेविषयी समजून घेतले पाहिजे असे आयुक्त सिंघल यांनी यावेळी सांगितले.

या पुस्तकाविषयी माहिती देतांना लेखक  दळवी यांनी सांगितले की, इंटरनेटचा वापरतांना घ्यावी लागणारी खबरदारी आणि योग्य मार्गदर्शन सर्वाना मिळत नाही. या क्षेत्राविषयी समाजात गांभीर्य आणि जागरूकता मुळीच दिसत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन सामान्य लोकांना याची माहिती व्हावी या उद्देशाने पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. पुस्तकात एकूण दहा प्रकरणे आहेत. यात सुरवातीला पासवर्ड कसा असावा, तो कसा हॅक होतो इथपासून पुढे वायफाय सिक्युरीटी, व्हॉट्सअॅप, सोशल मिडीया, बँकिंग, मोबाईल, ई मेल यांच्या सिक्युरीटीविषयी माहिती दिली असून ती कशी जपली पाहिजे हे सुद्धा सांगितले आहे.

याशिवाय समजा डेटा हॅक झाला किंवा सायबर गुन्हाची तक्रार करावी लागली तर ती कुठे करता येईल याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. मराठी भाषेतून अशाप्रकारे सायबर सिक्युरीटीची संपूर्ण माहिती देणारे हे बहुदा पहिलेच पुस्तक असल्याचा दावा यावेळी दळवी यांनी केला. सोबतच पुस्तकाची उपयुक्तात आणि गरज लक्षात घेता पुस्तकाची किंमत फक्त शंभर रुपये ठेवण्यात आली आहे. जेणेकरून सामान्य माणूसही अगदी सहजपणे पुस्तक घेऊन स्व:ता जागरूक राहू शकेल असेही त्यांनी सांगितले.

या प्रकाश सोहळ्याला नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सायबर पोलीस निरीक्षक देवराज बोरसे, दीपक देसले, इन्फिनिटी आय.टी.चे संचालक निलेश दळवी, आर्यव सेक़्युरिटी कन्सल्टिंग अॅण्ड रिसर्च प्रा.लि.चे अमर ठाकरे, कुलकर्णी, प्रथमेश लळिंगकर, शिवम शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

लेखक निलेश दळवी यांची ओळख
नाशिकमध्ये असलेल्या इन्फिनिटी आय.टी.चे संचालक असून गेल्या दहा वर्षाहून अधिक कालापासून सायबर सिक्युरिटी या विषयावर काम करत आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक संस्था, ६० महाविद्यालय यांना विविध कार्यशाळा, विशेष वर्ग, वर्कशॉप आदीच्या माध्यमातून लोकांना सायबर सिक्युरिटीचे धडे देत आहेत.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi , place and your name get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.