मग सरकार शेतकऱ्यांचे कर्ज का माफ करत नाही – पृथ्वीराज चव्हाण
नाशिक : फडणीस सरकार बड्या उद्योगपतीना साडे आठ लाख कोठी रुपयांचे कर्ज माफ करते. मात्र शेतकऱ्यांचे कर्ज का माफ करत नाही असे म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने नाशिकला आले असता ते बोलत होते. विधानसभेत आधी 19 आमदारांचे निलंबन केले मग परत ते रद्द देखील केले. यातून सरकारने सभागृहात विरोधकांचा आवाज दाबला असून हाच आवाज दाबल्याने आता आम्ही जनतेपर्यंत पोचण्यासाठी संघर्ष यात्रा काढत असल्याचे त्यांनी सांगितले. दरवेळी आमच्यावर कर्जमाफीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला जातो. यात मुळीच तथ्य नाही. त्यावेळी 2008 मध्ये आम्ही 72 हजार कोटीची शेतकर्याना कर्जमाफी केली असल्याचे त्यांनी सांगितले. आता राज्यातल्या शेतकर्यांच्या जमिनीचा सातबारा कोरा केल्या शिवाय गप्प बसणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात सिन्नर आणि इगतपुरीमध्ये समृद्धी महामार्गा ला मोठा विरोध होत आहे. या संदर्भात बोलतांना मुळातच सरकारचे धोरण चुकीचे आहे त्यामुळेच या प्रकल्पाला विरोध दिवसेन दिवस वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.