कर वाढीवरून शहरात नाराजी विशेष महासभा, कर वाढ रद्द होणार, मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

नाशिककरांसाठी दिलासादायक निर्णय होणार property tax cut down cm Devendra Fadnavis Vishesh Mahasabha  

नाशिक : मनपाचे उत्पन्न वाढावे आणि अनेक वर्ष कोणतीही कर वाढ झालेली नाही हे पाहता मनपा  आयुक्त तुकाराम यांनी कर वाढ केली होती. यामध्ये शहरातील येत असलेल्या शेत जमीनवर कर आकाराला जाणार असे चित्र होते मात्र ते सफसेल नाकारत ग्रीन झोन मधील शेत जमीनवर कोणताही कर नाही असे स्पष्ट केले आणि आधी वाढवलेला रु. ०.४० कर कमी करत रु.०.२० केला होता. मात्र आता येलो झोन मध्ये ८० टक्के जमिनी शेती होते त्यामुळे शेतकरी पुन्हा संतापले आहे. हा कर कमी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे, यासाठी नाशिकचे आमदार मुख्यमंत्री यांना भेटले असून हा कमी करणार किंवा रद्द असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.property tax cut down cm Devendra Fadnavis Vishesh Mahasabha  

हरित क्षेत्रच नव्हे तर रहिवासी क्षेत्रातही करवाढ लागू करू नये यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल झाले असून, त्यासंदर्भात आयुक्तांना आदेशित करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.आता कर वाढ रद्द साठी सत्तधारी भाजपाने विशेष महासभा बोलवली असून , यामध्ये करवाढ रद्द होणार अशी शक्यता आहे.

आमच्या वेबपोर्टल वर जाहिरात करायची असल्यास नक्की संपर्क करा, लाखो ग्राहकांपर्यंत पोहचा !

शहरातील मोकळ्या भूखंडावर कर लावण्याचा निर्णय आयुक्त मुंढे यांनी घेतला होता. या निर्णयामुळे खूप मोठा फटका महापालिका हद्दीत असलेल्या जवळपास २२ गावातील शेतकऱ्यांना बसणार आहे. एकरी एक लाख रुपयांहून अधिक कर शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरी सत्ताधारी भाजपच्या विरोधात जात असल्याने मुंढे यांनी घेतलेला निर्णय भाजपच्या अंगलट आल्याची परिस्थिती आहे.

नागरिक आणि शेतकरी विरोधात जात असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजप खडबडून जागी झाली. भाजपने विशेष महासभा बोलावली आहे. या महासभेत हा निर्णय रद्द करण्याचा ठराव करुन पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठविणार असल्याचा अंदाज आहे.सत्तधारी भाजपा आणि भाजपाच्या तिन्ही आमदारांना कोणतेही विकासकामे या काही वर्षात दाखवता आली नाहीत. तर पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावर दबाव आणून कोणताही मोठा प्रोजेक्ट किंवा निधी नाशिकला मिळाला नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आयांनी नाशिकला दत्तक घेतले आहे. त्यामुळे कार्यक्षम मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना नाशिकला पाठविले गेले आहे. मात्र सत्तधारी भाजपाला निर्णय घेतला की मागे घ्यावा लागतोय, त्यामुळे मुंढे यांना काम करू द्यायचे की नाही आणि शहराचा विकास कोणाला होवू द्यायचा नाही असा प्रश्न पडला आहे.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.