उत्पादन क्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधी……

उत्पादन क्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधी……प्रो. संतोष भाऊसाहेब सांगळे

[भारताला ‘manufacturing hub ‘ बनवण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. मेक इन इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया स्टार्ट अप इंडिया, प्रधानमंत्री मुद्रा लोण योजना यासारख्या सरकारच्या महत्वाकांक्षी योजानांमुळे भारत पुन्हा एकदा गुणवत्तापूर्ण निर्यातदार बनण्याच्या प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. परंतु ह्या महत्वाकांक्षी उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर गरज आहे ती  कुशल कामगार वर्गाची] 

कोणत्याही समाजाची, समूहाची किंवा देशाची प्रगती ही तेथे होणाऱ्या गुणवत्तापूर्ण उत्पादनावर निर्भर असते. माणसाची प्रगती म्हणजेच माणसाने स्वतःचे जीवनमान सुखकर, समृद्ध आणि सुरक्षित करण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून निर्माण केलेल्या नवनवीन गोष्टी. म्हणजेच गुणवत्तापूर्ण उत्पादनच मानवी समाजाच्या जीवनमानाची उंची दर्शवते. हेच जर वैज्ञानिक भाषेत सांगायला गेले तर,

मानवी प्रगतीचे मूल्यांकन = नैसर्गिक साधनसंपत्ती x (मानवी प्रयत्न)यंत्रे

ह्यावरून नवनवीन तयार होणारी यंत्रे आणि तंत्रज्ञान हेच  मानवी प्रगतीचे सुतोवाचक असतात हे  आपल्या लक्षात येते. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मानवी प्रयत्न यांचा इष्टतम (optimum) वापर आणि नवनवीन यंत्रांचा आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधीक वापर करून गुणवत्तापूर्ण उत्पादन करून घेण्यासाठीच अभियांत्रिकी क्षेत्राची निर्मिती झाली आहे.

पूर्वी आपल्या देशाला सोन्याची खान म्हणत असे त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारी साधनसंपत्ती आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन. आपल्या देशातील बऱ्याच वस्तू ह्या अरबी देशामध्ये निर्यात होत असल्याचे बरेच पुरावे आपल्याकडे आहेत. पण परकीय आक्रमणांनी आणि राज्यकर्त्यांनी आपल्या देशातील उत्पादकांचा केलेला ऱ्हास सगळ्यांनाच माहित आहे. परकीय वस्तूंचे आंधळे आकर्षण, आपल्या तंत्रज्ञानात असलेला संशोधनाचा अभाव, अकुशल कारागीर, सरकारची काही चुकीचे धोरणे आणि अशा बऱ्याच गोष्टीमुळे एकेकाळी गुणवत्तापूर्ण निर्यातदार असलेले आपला देश आज परकीयासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ बनली आहे आणि आपल्या देशातील चलनाचा प्रवाह दिवसेंदिवस दुसऱ्या देशात वाढतच आहे.

परंतु आजची परिस्तिथी मात्र खूप वेगाने बदलत आहे. पुन्हा एकदा भारताला ‘manufacturing hub ‘ बनवण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. ‘मेक इन इंडिया’,’ स्टॅन्ड अप इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘प्रधानमंत्री मुद्रा लोण योजना’ यासारख्या सरकारच्या महत्वाकांक्षी योजानांमुळे भारत पुन्हा एकदा गुणवत्तापूर्ण निर्यातदार बनण्याच्या प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. परंतु ह्या महत्वाकांक्षी उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर गरज आहे ती  कुशल कामगार वर्गाची. हि गरज पूर्ण करण्यासाठी सरकार सुद्धा ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजना’ यासारख्या योजनांमधून प्रयत्न करत आहे.

बदलत्या उत्पादनाचे तंत्रज्ञान आणि पद्धती यामुळे विविध क्षेत्रातील कुशल कारागिरांची गरज येणाऱ्या काळात भासणार आहे. तसेच चवथ्या औद्योगिक क्रांतीला सक्षमपने सामोरे जाण्यासाठी येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर Production Engineer’s, Industrial Engineer’s इत्यादींची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. दिवसेंदिवस अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होतानी दिसतोय, परंतु बुद्धिमान गुंतवणूकदार भविष्याचा वेध घेऊन पडतीच्या काळातच वस्तू खरेदी करून नंतर त्यावर नफा कमावतो त्यामुळेच खरच सृजनशील, नवनवीन प्रश्न सोडवण्याची आवड, धगधगती इच्छाशक्ती, व्यवस्थापनाची आवड असणाऱ्या बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उत्पादन अभियांत्रिकी (Production Engineering) सारख्या स्पेशलाईझ शाखा अत्यंत चांगला पर्याय उपलब्ध आहे. तसेच Automation, robotics, Advance welding processes etc.  ह्या क्षेत्रातील कुशल कामगार, ITI होल्डर्स, Technician’s, Engineer’s यांची कमतरता पुढील काळात जाणवणार आहे. तरी हि देशाची गरज पूर्ण करण्यासाठी आज तरुणांनी ह्या महत्वाच्या क्षेत्राकडे वळून अपेक्षित कौशल्य विकसित करणे अपेक्षित आहे.

नाव- प्रो. संतोष भाऊसाहेब सांगळे

संस्थेचे नाव -के. के. वाघ इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग एजुकेशन अँड रिसर्च ,

पत्ता- हिराबाई  हरिदास  विद्यानगरी , अमृत -धाम , पंचवटी , नाशिक , महाराष्ट्र  ४२२००३

भ्रमणध्वनी- ७५८८५५७२०३

ई-मेल- sbsangle@kkwagh.edu.in

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.