आज शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

दुपारी १२ वाजेपासून या मार्गावरील वाहतूक बंद : वाकडीबारव ते रामकुंडदरम्यानचा मार्ग

नाशिक : शहरात मोठ्याप्रमाणात साजरी केल्या जाणाऱ्या तिथीप्रमाणे येणारी छत्रपतीशिवाजी महाराज यांची बुधवारी (दि. १५) जयंती निमित्त शहर परिसरातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. राजकीय पक्ष तसेच सामाजिक मंडळांकडून या शिवजयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात मिरवणूका आयोजित करण्यात आल्या आहेत. या मिरवणूकांचा मार्ग आधीच ठरविण्यात येतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलिस शाखेने वाहतूक मार्गात बदल केला अाहे. दुपारी १२ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

असा आहे मिरवणूक मार्ग : वाकडीबारव पासून जहांगीर मशीद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, अब्दुल हमीद चौक, भद्रकाली मार्केट, मेनरोड, धुमाळ पाॅइंट, महात्मा गांधी रोड, सांगली बँक सिग्नल, स्वामी विवेकानंद रोड, अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशुरामपूरिया रोड मार्गे रामकुंड परिसर.

शहर बस वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आले असून निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजावरून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बस पंचवटी डेपाेतून सुटणार आहेत. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या बस व इतर सर्व वाहने आडगाव नाक्यावरून महामार्गाने द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहर अन्य ठिकाणी जातील. पंचवटीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने द्वारका सर्कलकडून कन्नमवार पुलावरून जातील.

दरम्यान शिवजयंती निमित्त राजकीय पक्ष आणि सामाजिक मंडळांनी चौकाचौकात मोठ मोठे स्टेज उभारून जय्यत तयारी केली असून सर्वत्र भगवे झेंडे दिसत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.