महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सभेने नाशिक येथे संपन्न होणार – ना.गिरीश महाजन

नाशिक : मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेस पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात  जनतेचा उत्सफुर्त प्रतिसाद तिसर्‍या टप्प्याचा समारोप पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सभेने नाशिक येथे संपन्न होणार. अशी माहिती नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाच्या आशादीप मंगल कार्यालय येथे आयोजित  बूथ प्रमुखाच्या संमेलनात ना. गिरिश महाजन यांनी संगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिनांक १९ सप्टेंबर रोजी नाशिक येथे येणार आहेत. ००

व्यासपीठावर यावेळी प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनिल बागुल, आ.बाळासाहेब सानप, भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, भाजपा ज्येष्ठ नेते विजय साने, महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती उध्दव निमसे, जिल्हा अध्यक्ष दादा जाधव,  सरचिटणीस उत्तम उगले, संभाजी मोरूस्कर, पंचवटी मंडल अध्यक्ष चन्द्रशेखर पंचाक्षरी, नाशिकरोड मंडल अध्यक्ष बाजीराव भागवत, युवा मोर्चा सरचिटणीस अमित घुगे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे महाजन आपल्या भाषणात म्हणाले की महाजनादेश यात्रेतून लाभलेल्या देवेन्द्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवरील विश्वासाचे प्रतिबिंब बघायला मिळाले. कार्यकर्त्यांचे अथक परिश्रमातून व जनतेच्या विश्वासातून भाजपाची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे. राज्यातील विरोधी पक्षांचे अस्तित्वच राहते की नाही असे चित्र निर्माण झालेले दिसत आहे. स्वत:चे अस्तित्व जपण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष्यातील मातब्बर नेते भाजपा प्रवेशाची संधीची वाट बघत आहेत. परंतु सध्या तरी प्रवेश प्रक्रिया स्थगित असल्याचे त्यांनी संगितले.

यावेळी  आपल्या भाषणातून लक्ष्मण सावजी म्हणाले की जे मतदार आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी संपर्क हवाच परंतु जे आपल्या बरोबर नाहीत त्यांच्याशी घरोघरी जावून प्रत्येक मतदार हा भाजपाशी जोडला पाहिजे कारण बूथ प्रमुख हा जनसामान्य मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा, देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, या सर्वांचा प्रतिनिधित्व करित असतो म्हणून बूथ प्रमुखांनी आपल्या दिलेल्या जबाबदार्‍या तसेच संघटनेने व सरकारने पार पाडलेल्या विविध कार्याची माहिती जनतेपर्यन्त पोहोचण्याची जबाबदारी बूथ प्रमुखांची आहे असे ते म्हणाले यावेळी त्यांनी नाशिक पूर्व विधानसभेतील बूथ रचनेचा आढावा घेतला .            

 यावेळी आ.बाळासाहेब यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील आपल्या विविध विकास कामांचा आढावा सादर केला व बुथ रचनेबद्दल सद्या स्थितीची माहिती दिली. शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी आपल्या भाषणातून नाशिक पूर्व बुथ रचनेचा आढावा घेतला व बुथ प्रमुखांना कार्यपध्दतीबद्दल मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नेते विजय साने यांनी आपल्या भाषणातून प्रभावी बुथ रचनेमुळेच कार्यकर्त्यांचा व जनतेचा आपआपसातील संपर्क वाढला आणि गत विधानभेत तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळाले त्यामुळे बुथ प्रमुखाची भुमिका फार महत्वाची असते असे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे उपस्थितांचे प्रास्ताविक नाशिक पूर्व मंडल अध्यक्ष चन्द्रशेखर पंचाक्षरी यांनी केले. आभारप्रदर्शन नाशिकरोड मंडल अध्यक्ष बाजीराव भागवत यांनी केले. सुत्रसंचलन युवा मोर्चा  सरचिटणीस अमित घुगे यांनी केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.