अल्पवयीन मुलीचे अपहरण, परप्रांतीयांनी केला सहा वर्ष बलात्कार

नाशिक : भयानक प्रकार उघड झाला असून, अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिला उत्तर भारतात विक्री केली आणि तब्बल सहा वर्षे तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. नांदुरनाका परिसरातील रहिवासी असेलल्या मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. बारा वर्षीय मैत्रिणीस जेवनातून गुंगीचे पदार्थ खाऊ घालून तिचे अपहरण केल्यानंतर दिल्लीतील एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून दिला होता. संशयित व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तब्बल सहा वर्ष या मुलीवर बलात्कार केला आहे.preteen girl kidnapped rape north India   for six years Nashik Police


जेव्हा ही पीडित मुलगी नाशिकला अथक प्रयत्न करत ती परत आली आहे. आडगाव पोलीस ठाण्यात आठ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील मुख्य सूत्रधार महिला संगीता होंडे (विहितगाव, देवळाली कॅम्प) महिलेला पोलिसांनी लगेच अटक केली आहे.preteen girl kidnapped rape north India   for six years Nashik Police

या लहान पीडित मुलीने पोलिसात दिलेल्या फियार्दीनुसार, तिचे  २०१२ मध्ये आईसमवेत नांदूर नाका परिसरात राहत होती. तिच्या घराच्या शेजारी तिची मैत्रीण गौरी हिची आई संशयित नंदा जाधव हिने जेवणात गुंगीचे औषध खाऊ घातले होते. मुलगी बेशुद्ध आहे लक्षात आल्यानंतर एका रिक्षात टाकून संशयित मंगला या महिलेकडे सोडून दिले होते. तर मंगलाने महिनाभर एका खोलीत कोंडून नंतर या मुलीस पूजा नावाच्या महिलेकडे पाठविले होते. मग पुढे या बालिकेला संशयित संगीता, रंजना, राजू , संजय, विनोद यांच्यासोबत दिल्ली व उत्तर प्रदेशातील रतोडा गावी नेले होते. संजयसोबत या मुलीचे  जबरदस्तीने लग्न लावून दिले होते.preteen girl kidnapped rape north India   for six years Nashik Police

मुख्य संशयित संजयकडून रोज  मारहाण होत होती, सोबतच २०१२ ते २२ सप्टेंबर २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत तिच्यावर अनेकदा  बलात्कार केला आहे. संजय त्याचा भाऊ विनोद  दोघांनीही या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असून या मुलीने दोन मुलांनाही जन्म दिला आहे़.

पीडित मुलीने विवाह झालेल्या संशयित संजय यास रक्षाबंधनासाठी आईकडे जाण्याचा हट्ट तसे ते नाशिकला आले होते.देवळाली कॅम्प येथून खरेदी केलेल्या महिलेकडे पिडीतेला आणले जेव्हा पुन्हा तो परतीस निघाला तेव्हा पिडीतेने मनमाड रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरून घेतल्याने, या मुलीला तिच्या आईकडे सोडून फरार झाला़ आहे.preteen girl kidnapped rape north India   for six years Nashik Police

या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार नंदा जाधव, मंगला, पूजा, संगीता, रंजना, राजू, संजय व विनोद या आठ संशयितांविरोधात अपहरण, बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ .

 

preteen girl kidnapped rape north India   for six years Nashik Police
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.