Press Note आ.फरांदे यांच्या “जनता दरबाराला” नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

जनतेच्या गरजा ओळखून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानीताई फरांदे यांची वेगळी ओळख आहे. जनसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आ.देवयानीताई फरांदे यांनी दि.७ आँक्टोबर रोजी सायंकाळी ६ः०० वाजता अयोध्या काँलनीत “जनता दरबार “भरविला होता. Press Note

या जनता दरबारात नागरिकांनी आपल्या समस्या निर्धास्तपणे मांडाव्यात त्या समस्यांवर त्वरित उपाय केले जातील असे आवाहन आ. फरांदे यांनी केल्यानंतर नागरिकांनी आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगितल्या. स्ट्रिट लाईट्स, स्पीड ब्रेकर्स नसल्याने होणारे अपघात, ड्रेनेज पाईप, हायमास्ट, परिसरातील अस्वच्छता, अश्या विविध समस्यांवर जनता दरबारात सविस्तर चर्चा झाली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचनाही संबंधित अधिका-यांना आ. देवयानी फरांदे यांनी केल्या. परिसरातील मोकळ्या जागेत कचरा टाकून परिसर अस्वच्छ करण्याची समस्या नागरिकांनी मांडल्यानंतर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच असून आपण वैयक्तिक पातळीवर यासाठी प्रयत्न केले पाहीजेत.

अस्वच्छता पसरविणा-या नागरिकांना वेळीच समज दिली पाहीजे. असे सांगत आ. फरांदे यांनी स्वच्छतेविषयी जनजागृती केली.नागरिकांच्या तक्रारीनुसार संबंधित भागाची पाहणी करुन तेथील समस्यांचा आढावाही आ.फरांदे यांनी घेतला.

यावेळी नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका स्वाती भामरे, एम.एस.सीबीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चेतन नंदनवार, मनपा बांधकाम विभाग उपअभियंता संजय पाटील, विद्युत विभाग उपअभियंता अनिल गायकवाड, सहा.अभियंता प्रशांत बोरसे, राजीव भामरे, अमित डिजिटलचे घोलप, बाबूराव चव्हाण, रमेश जाधव, जिभाऊ पाटील, कामगार युनियनचे अध्यक्ष गणेश पवार, साळूंखे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आ.फरांदे यांनी गेल्या पाच वर्षात “आमदार आपल्या दारी” हा यशस्वी उपक्रम राबवून जनतेच्या समस्या सोडविल्या होत्या. जनसामान्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्यानुसार आपल्या मतदारसंघात विकासकामे करणे हे आ.देवयानी फरांदे यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे.Press Note

वरील प्रसिद्धीपत्रक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी :

बातमी वाचायला कृपया लिंक क्लिक करा
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.