राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींचे प्रथमच जाहीर सभेत भाष्य, सेनेवर टीका

नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात आला . यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते . मोदी यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा , काश्मीरचे 370 कलम यासह विविध मुद्दयांवर आपले परखड मत व्यक्त केले.नरेंद्र मोदी यांनी प्रथमच  राम मंदिरावरही त्यांची भुमिका स्पष्ट केली . तसेच मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधकांच्या टीकेलाही उत्तर दिले आहे.नरेंद्र मोदी म्हणाले की अयोध्या येथील राम  मंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे . न्यायालय हे सर्व  प्रकरण ऐकून घेत आहे . मात्र  वाचाळवीर कुठून येतात हे अजून समजले नाही.  का ते या प्रकरणामध्ये अडचण निर्माण करू पाहत आहेत ? सर्वोच्च न्यायालय .

बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आणि न्यायप्रणालीवर आपला विश्वास असायला हवा . या नाशिकच्या पवित्र जमिनीवरून मी अशा वाचाळवीरांना आवाहन करतो की त्यांनी त्यांचे तोंड बंद ठेवावे. तर रामासाठी , देवासाठी डोळे बंद करून न्यायव्य वस्थवरावश्वास ठेवावा असे मोदी म्हणाले आहेत . काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राम मंदिराची मागणी केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत वार्तालाप करतांना.
पाकिस्थानचे कौतुक आणि शरद पवार यांच्यावर मोदींची सडकून टीका

पाकिस्थान येथे घेतलेल्या पाहुणचाराची प्रशंसा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचाही मोदींनी पुरेपूर  समाचार घेतला आहे. मोदी म्हणाले की,  काँग्रेस पक्षाचे होणारे नेहमीप्रमाणे मी कन्फ्युजन समजू शकतो. मात्र  शरद पवार यांनी व्होटबँकेच्या राजकारणासाठी केलेल्या चुकीच्या वक्तव्यांमुळे मला  दुःख झाले आहे असे  मोदी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप नाशिकमध्ये झाला . या यात्रेच्या समारोपाला मोदी उपस्थित होते . यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , पंकजा मुंडे , उदयनराजे भोसले , गिरीश महाजन , विनोद तावडे , रावसाहेब दानवे आदी भाजप नेते उपस्थित होते . 
नाशिकच्या पावन आणि धर्मभूमीला माझे नमन असे म्हणत मराठीतून मोदींनी भाषणाची सुरवात केली . मोदी म्हणाले , ” छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी स्वतः माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवले आहे . हा माझा सन्मान असून , त्यांच्याप्रती माझी जबाबदारी आहे .

मोदींच्या सभेला उपस्थित नागरिक

आपल्याकडे यात्रेचे कायम परंपरा राहिली आहे . देवेंद्र यांच्या यात्रेला मी नमन करण्यासाठी आलो आहे .  महाराष्ट्रात स्थिर सरकार चालवून राज्याला एक दिशा दिली आहे . आता महाराष्ट्राची जबाबदारी आहे , की त्यांनी आता त्यांच्या स्थिर राजकारणाचा फायदा घेतला पाहिजे .  गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांनी केलेल्या कामाचे रिपोर्टकार्ड त्यांनी तुमच्यासमोर ठेवले आहे .

गेल्या पाच वर्षांत मानसन्मान मिळाला . तसेच गुंतवणूकदारांना चांगली वागणूक मिळाली आणि गुंतवणूक वाढली . फडणवीस सरकारमुळे कायदा सुव्यवस्था सुस्थितीत आहे . ” आपल्या देशात 60 वर्षांनंतर सरकार पूर्ण ताकदिनीशी निवडून येते . पूर्ण ताकद मिळाल्यानंतर सरकार कसे काम करते हे आपण पाहत आहात . 

पुढे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सभेत काश्मीर प्रश्न आणि पाकिस्तानचा आवर्जुन उल्लेख केला आहे. मोदी म्हणतात की आपल्याच देशातील काहीनेत्यांच्या वक्तव्यांमुळे शत्रूचा फायदा होत आहे. पाकिस्तानी पाहुणचार भावला, असे सांगणाऱ्या शरद पवार यांच्यावरही मोदींनी घणाघाती टीका केली. ते म्हणाले, “काँग्रेसी नेत्यांचे कन्फ्युजन मी समजू शकतो, पण शरद पवार? केवळव्होटबँकेच्या राजकारणासाठी शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते जेव्हा अशी चुकीची वक्तव्ये करतात तेव्हा दुःख होते. त्यांना शेजारीलदेश चांगला वाटतो, ही त्यांची मर्जी.

मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा

तेथील शासक, प्रशासक चांगले वाटतात, हे सुद्धा त्यांचेच निरीक्षण आहे. पण दहशतवादाची फॅक्टरीकुठे आहे, अत्याचार आणि शोषणाची छायाचित्रे कुठून येतात हे संपूर्णमहाराष्ट्र आणि देश जाणतो.” असा टोला मोदींनी शरद पवार यांना लगावला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानमधील लोकांची प्रशंसा केली आहे.

नरेंद्र मोदी यांचे स्वागत.


मोदी म्हणाले – 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच एक सरकार दुसऱ्यांदा निवडून दिले – 100 दिवसांत निर्णय , लोकांनी ताकद दिल्यास काय होते ते पहिले ( कलम 370 ) , – 5 वर्षात सामाजिक सदभाव मिळाला , आधुनिकता , गुंतवणूक , शेतकयांना सन्मान मिळाला , महिलांना स्वयंरोजगाराची संधी ,  – सत्तेचा हिशोब देण्याचे आश्वासन पुर्ण केले – साफ सूत्री चित्र आहे , विकासाचा जोश , वैश्विक ताकदीचा जोश , अर्थतंत्र सुधारण्याचा प्रयत्न आहे , – पंतप्रधान किसन सन्मान योजनेचे आश्वासन पूर्ण , – छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन , गावागावात वीज , शौचालय दिले – आता घराघरात पाणी पोहोचवणार – पशुधनाला वाचविण्यासाठी लस देणार – विरोधी पक्षांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.