प्रभाग समिती सभापती निवड : मनसे, शिवसेना आणि भाजपचे विराजमान

नाशिक महानगर पालिकेच्या नवीन नाशिक,सातपूर व नाशिकरोड या तीन प्रभाग सभापती  पदाची निवडणूक विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी मा.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या प्रभाग समिती निवडणुकीत नवीन नाशिक सिडको प्रभाग समिती सभापती पदी शिवसेनेच्या हर्षदा बडगुजर यांची बिनविरोध निवड झाली.  मनसेचे योगेश शेवरे यांची सातपूर प्रभाग समिती सभापती पदी तर नाशिकरोड प्रभाग समिती सभापती पदी भाजपचे पंडित आवारे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासन अधिकारी मा.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी केली.यावेळी नगरसचिव गोरखनाथ आव्हाळे यांनी कामकाज पहिले.नवनियुक्त सभापती यांचा सत्कार पिठासन अधिकारी मा.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी व मा.महापौर रंजना भानसी यांचे सह पदाधिकारी यांनी केला.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.