वाढत्या तापमानामुळे पोल्ट्री व्यवसाय घोक्यात विशेष रिपोर्ट

तपमानवाढीचा फटका: पक्षी मृत्यूच्या प्रमाणात वाढ

(येवला –   विलास कांबळे )  सतत हवामानात होणाऱ्या बदलामुळे व वाढत्या तपमानामुळे पोल्ट्री फॉर्म मधील पक्षी मरण पावत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत आहेत.

शेतकरी जोड व्यवसाय म्हणून गाई, म्हशी, बकरी, पालन म्हणजे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहे त्याच बरोबर गावठी कोंबड्या ही मोठ्या प्रमाणात पाळत असून, त्यामुळे अंडी व चिकनचा प्रश्न काही प्रमाणात सुटत असे परंतु जस-जसा शेतीच्या विकास होत गेला तस तसे शेती पूरक जोडधंद्या मध्ये वाढ झाल्याने दुय्यम दर्जाचे व्यवसायाची गरज भासू लागली आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून शेती व्यवसाय तोट्यात येऊ लागला आहे.

शेतीमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे शेतकऱ्यांचा मुलगा जरी शिकला असला तरी त्याला नोकरी न मिळाल्यामूळे वेगवेगळ्या व्यवसायत शेतकऱ्याचे साधन बनू लागल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फॉर्म कडे वळू लागले गारखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री शेडचे उभे राहिले या पोल्ट्री बाथकामांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो यंदा पाऊस ढगाळ व अती ऊष्ण तापमान वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात धोक्यात आला आहे बॉयलर कोंबडीसाठी थंड हवामान पोषक असते या हवामानामुळे कोंबड्याच्या मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील व्यवसाईकांनी बरेच पोल्ट्री फॉर्म बंद करून ठेवले आहे या वर्षी सारखी उष्णता कधी नाही जाणवत असे व्यवसायिक बोलतात येथील माणसांना पाण्याची तिर्व टंचाई भासत असल्याने पक्ष्यांना पाणी कुटून आणायचा असा प्रश्न पडत आहे त्यामुळे येथील पोल्ट्री फॉर्म सुखसुखाट दिसत आहे या हवामानापासून बरेच पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यावर उसायाचे पाचट बारदान नारळांच्या झाडयांच्या फांद्या आदी टाकल्या होत्या तरी या वर्षी उष्णता हि तिर्व असल्याने त्याचा परिणाम हा फारसा काही होत नाही या वर्षांचे वातावरण पोल्ट्री व्यवसायासाठी अनुकूल नाही त्यामुळे बरेच व्यवसाईकांनी पोल्ट्री शेडमधील पिल्ले हे न टाकल्याने रिकामे दिसून येत आहेत त्यामुळे बॉयलर च्या भावात वाढ झालेली दिसून येत आहे.

“मागील दोन वर्षांपासून गारखेडे परिसरात पर्जन्यमान अतिशय अल्पप्रमानात पडले आहे.त्यातच उष्णतेच्या तीव्र लाटेने येथील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आले असून ,कडक पडणाऱ्या उन्हाने कोंबड्याचा मृत्यू होत आहे.त्यातच पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याने  पोल्ट्री व्यावसायिकांनी यंदा पोल्ट्री शेड बंद केल्याचे चित्र गारखेडेत दिसून येत आहे”.

– विजय खैरनार, सामाजिक कार्यकर्ते, गारखेडे

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.