लासलगाव डाळींब लिलावाचा शुभारंभ

लासलगांव  बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावरील डाळींब लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.
प्रारंभी सभापती होळकर व सदस्य रमेश पालवे यांच्या हस्ते प. पु. भगरीबाबांच्या प्रतिमेचे व डाळींब क्रेटस् चे विधीवत पुजन करण्यात आले. मुहुर्तावर मदीना फ्रुट अॅन्ड व्हेजीटेबल कंपनीच्या अडतीत सैय्यद मोहसीन सैय्यद मुश्ताक या खरेदीदाराने हरीश्चंद्र पंडीत आहेर, रा. मकरंदवाडी, ता. देवळा यांचा डाळींब रू. 1,601/- प्रती क्रेटस् या दराने खरेदी केला.

 सभापती जयदत्त होळकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, लासलगांवसह परीसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगांव, सिन्नर, कोपरगांव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यातील गावांमध्ये शेतक-यांनी डाळींब ह्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. त्यामुळे सदर शेतक-यांना डाळींब विक्रीसाठी जवळ सोय निर्माण व्हावी म्हणुन लासलगांव बाजार समितीने गेल्या तीन वर्षापासुन डाळींब लिलाव सुरू केले असुन त्यास शेतकरी व व्यापारी वर्गाकडुन उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चालु हंगामातील डाळींब लिलाव आजपासुन सुरू केले आहे. डाळींब उत्पादक शेतक-यांना वजनमापानंतर लगेच रोख चुकवती केली जाणार असुन अल्पावधीत कांद्यापाठोपाठ डाळींब विक्रीसाठी लासलगांव बाजार समिती नावारूपास येणार आहे.

शेतकरी बांधवांनी 20 किलोच्या क्रेटस्मध्ये एकसारखा माल प्रतवारी करून विक्रीस आणल्यास व्यापारी वर्गाकडुन त्यास चांगले बाजारभाव दिले जातील. तसेच वजनमापाचे वेळी किडका, रंगहीन म्हणुन वांधे पडणार नाही. रविवार वगळता इतर सर्व दिवशी सकाळी 09.30 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत अथवा आवक संपेपर्यंत डाळींब लिलाव होणार असल्याने शेतकरी बांधवांनी आपला डाळींब हा शेतीमाल लासलगांव बाजार समितीत विक्रीस आणावा असे आवाहन श्री. होळकर यांनी केले.

याप्रसंगी बाजार समितीचे व्यापारी सदस्य सचिन ब्रम्हेचा, सचिव बी. वाय. होळकर, सहाय्यक सचिव सुदीन टर्ले, लेखापाल नरेंद्र वाढवणे, दत्तात्रय होळकर, सुरेश विखे, दिपक खैरे, प्रभारी हिरालाल सोनारे, नामदेव बर्डे, डाळींब व्यापारी मोहसीन सैय्यद, पापा शेख, गफार देशमुख, मुज्म्मील पठाण, तबरेज शेख, सुधीर मोरे यांच्यासह परीसरातील डाळींब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

लिलावाचे पहिल्या दिवशी एकुण 211 क्रेटस् मधुन डाळींब विक्रीस आले. कमीत कमी रू. 200/-, जास्तीत जास्त रू. 1,601/- व सरासरी भाव रू. 1,150/- प्रती क्रेटस् मिळाला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.