पोलीस कृतज्ञता दिन : नाशिक सायकलीस्टने केला साजरा

नाशिक : शुक्रवारी (दि. ११) नाशिक सायकलीस्टसह विविध सामाजिक संस्थांनी आवाहन केल्याप्रमाणे पोलीस कृतज्ञता दिन सायकलीस्ट सदस्यांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह नाशिक शहर पोलीस आयुक्तालय, सर्व विभागीय कार्यालये, सरकारवाडा, पंचवटी, म्हसरूळ, आडगांव, नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, अंबड, सातपुर गंगापुर, भद्रकाली, मुंबई नाका पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल आणि एक पेन भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न सायकलीस्ट सदस्यांकडून करण्यात आला. Police Thankgiving Day celebrated Nashik Cyclists Foundation

सामान्य नागरिक आणि पोलीस बांधव यांच्यातील सुसंवाद वाढून अपप्रवृत्तींना नैतिक धाक निर्माण व्हावा, पोलीस दल आणि सकारात्मक नागरिक सोबत आहेत हा संदेश संपूर्ण समाजात पोहचावा म्हणून आपण ‘पोलीस कृतज्ञता दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, डॉ. मनीषा रौंदळ, रवींद्र दुसाने, रेखा चव्हाण, साधना दुसाने, चंद्रकांत नाईक, संजय पवार, सतीश महाजन, अथर्व शिवडेकर, प्रणव शेळके, सुरेश डोंगरे, आदी सदस्य उपस्थित होते. Police Thankgiving Day celebrated Nashik Cyclists Foundation

गत दोन वर्षांच्या कालावधीत म्हणजेच डॉ. रवींद्रकुमार सिंगल नाशिक शहर पोलीस आयुक्तपदी आल्यापासून विविध सामाजिक संस्था, डॉक्टर्स, शैक्षणिक संस्था, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व जागरूक सामान्य नागरिक यांना सोबत घेऊन शहरातील सामाजिक समस्या व सुधारणा यावर चर्चा व प्रत्यक्ष उपाययोजना यासाठी सातत्याने विविध मोहिमा राबवत आहेत. हे शासन व समाज यांच्यातील एकात्मता व समन्वय याचं सर्वोत्तम उदाहरण होय. परिणामस्वरूप आवाज प्रदूषण, वाहतूक नियमन, नशाबंदी यासह अनेक गंभीर प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे, जी आपल्या शहरासाठी अत्यंत आनंदाची, समाधानाची व अभिमानाची बाब आहे.

 

Police Thankgiving Day celebrated Nashik Cyclists Foundation, Dr. Ravindrakaumar Singal Nashik City Police Commissioner नाशिक सायकलीस्ट नाशिक शहर पोलीस कृतज्ञता दिन सामाजिक संस्था मी नाशिककर helmet traffic awareness no honking day mi nashikkar ngo in nashik city nashikonweb news live updates website

यावेळी नाशिक सायकलीस्ट सदस्यांकडून नो होर्न डे, वाहतूक सुरक्षा अभियान, सीटबेल्ट, हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती यामध्ये असलेल्या सहभागाबद्दल नाशिक पोलिसाकडून कौतुक करण्यात येऊन ही मोहीम अधिक व्यापक व्हायला हवी अशी अपेक्षा आयुक्त सिंगल यांनी व्यक्त केली आहे. यावेळी नाशिक पोलिसांकडे वापरात असलेल्या विविश शस्रांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. Police Thankgiving Day celebrated Nashik Cyclists Foundation

गेल्या शनिवारी आयोजित नाईट एनआरएम मध्ये पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासोबत अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह १०० सायकलीस्टने सहभाग नोंदविला. आजवर झालेल्या 16 एनआरएम राईड्समध्ये पोलीस खात्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. महिला दिनानिमित्त होणाऱ्या सायकल राईडमध्येही पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे नाशिक सायकलीस्ट आणि नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून होणाऱ्या उपक्रमांद्वारे सायकल आणि समाज यांचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होत आहे. Police Thankgiving Day celebrated Nashik Cyclists Foundation

येत्या १३, १४ आणि १५ जुलै दरम्यान आयोजित पंढरपूर सायकल वारीमध्ये पोलीस दलाच्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आले. तर यासाठी विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी केली.

Police Thankgiving Day celebrated Nashik Cyclists Foundation

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.