पोलिसांची दडपशाही : ABP माझा वृत्त वाहिनीच्या टीमला धक्का बुक्की

नाशिक : आपल्या हक्कासाठी तब्बल चार दिवसांपासून  पायी येत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना बळजबरीने डांबण्याचा प्रकार   सिन्नर पोलिसांनी केला आहे. त्यात माध्यम म्हणून  या विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेत असलेल्या एबीपी माझाच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे. इतकेच न थांबता त्यांनी कॅमेराची तोडफोड केली आहे.

Nashikonweb.com या पूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करत असून जर पोलिसच सुरक्षा देत नसतील आणि बळाचा चुकीचा वापर करत असतील हे योग्य नाही. सरकारने आणि स्थानिक पदाधिकारी , लोकप्रतिनिधी यांनी देखील यात योग्य कारवाई करणे  गरजचे आहे.

पुणे येथून  नाशिक कडे पायी निघालेल्या  आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा आज सिन्नर पोलिसांनी नांदूरमध्ये अडवला होता. सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला. मात मागील  4 दिवसांपासून ही मुलं भर पावसामध्ये पुण्याहून चालत निघाली होती.

आपल्या न्याय मागण्या आदिवासी विकास महामंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते येत होते. मात्र पोलिसांनी शांततेत चाललेल्या या विद्यार्थ्यांवर दडपशाही करत त्यांना अडविले. तर  विद्यार्थ्यांची एबीपी माझा  वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी धमकावलं आहे.  त्यांच्या कॅमेऱ्याची नासधूस केली आणि काही काळ डांबूनही ठेवल होते.

एबीपी माझाचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आणि कॅमेरामनला पोलिसांनी धक्काबुक्की केली. शांततेच्या मार्गाने आपल्या हक्कांसाठी मोर्चा काढणं हा गुन्हा आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास विद्यार्थी आले होते. एबीपी माझाचे प्रतिनिधी नितीन ओझा बातमी कव्हर करण्यासाठी गेले. त्यांनाही जवळ जाऊ दिलं नाही. त्यानंतर एबीपी माझाचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी हे घटनास्थळी गेले. विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेत असताना मुकुल कुलकर्णी आणि किरण कटारे यांना धक्काबुक्की करण्यात आली. शिवाय कॅमेराची नासधुस केली. पोलीस विद्यार्थ्यांच्या जवळही कुणाला जाऊ देत नव्हते. प्रत्येक गाडीची तपासणी करत होते. पोलीस सर्वांना विद्यार्थ्यांच्या जवळ जाण्यासाठी प्रवेश नेमका का नाकारत होते, याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही. मोर्चा जसा जसा नांदूरच्या जवळ आला, तसे पोलीसही वाढत आले. लवकर निघण्याची घाई केली, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सर्व विद्यार्थी 18 तारखेला नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तलयासमोर जमणार होते. आदिवासी विद्यार्थी आणि पत्रकारांसोबतचा हा प्रकार लोकशाहीच्या विरोधातला आहे. या अन्यायाविरोधात विधानसभेत प्रश्न उपस्थित करु, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

(वृत्त साभार ABP माझा वृत्तवाहिनी )

बातमीची लिंक :

https://abpmajha.abplive.in/nasik/police-lathicharge-on-adivasi-students-and-stopped-abp-majha-for-coverage-563098

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “पोलिसांची दडपशाही : ABP माझा वृत्त वाहिनीच्या टीमला धक्का बुक्की

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.