दारूचा पूर,पोलिसांनी दोन घटनात पकडला ३८ लाख रु. अवैध साठा

निवडणुका जश्या जवळ येत आहे, तसा उमेदवार तळीराम मतदारांची सोय करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र पोलिसांनी जिल्ह्यात अवैधरीत्या येणारी दारू पकडली असून, तब्बल ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. smuggled liquor

पहिल्या घटनेत पोलिसांनी , पंजाब येथून निर्मित करण्यात आलेला, सोबतच अरुणाचल प्रदेश, चंदीगढ केंद्रशासित प्रदेशात फक्त  विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा पकडला आहे. निवडणूक कालावधीत हा सर्व माल विक्री करण्यासाठी आणला गेला होता. पोलिसांनी सापळा रचत हतगड शिवार येथील सावमाळ गावातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात लपवून ठेवलेला २७ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा पकडला आहे.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या नुसार, आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा तालुक्यातील हतगड शिवार येथील सावळमाळ गावातील बांधकामस्थितीत असलेल्या इमारतीत छापा टाकला होता. पथकाच्या यावेळी थोडे थोडके नव्हे तर मोठा साठा सापडला आहे.

पंजाब राज्यात निर्मित करण्यात आलेल्या व अरुणाचल प्रदेश या एकमेव राज्यात विक्रीस परवानगी असलेले मद्य सापडले आहे. निरीक्षक आर. एम. फुलझळके, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, एस. एस. रावते, लोकेश गायकवाड, दीपक आव्हाड, आदींच्या पथकाने झडती केली. कारवाईत एकूण २६ लाख ७१ हजार ५६० रुपये किमतीचे मद्याचे अवैधरीत्या साठा करून ठेवलेले सुमारे ५७३ खोके उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले असून सुनील लक्ष्मण खंबायत (२१, रा. हतगड) यास अटक केली आहे.

कोणती किती दारू :

१८० मी.लिच्या ब्ल्यू व्हिस्कीच्या १४ हजार ११२ सीलबंद बाटल्या त्यांचे २९४ बॉक्स, किंमत अंदाजे १८ लाख ३४ हजार ५६० रुपये

जिन्सबर्ग प्रीमियम स्ट्रॉँग बियरच्या ५०० मी. ६ हजार ६९६ सीलबंद टीन २७९ बॉक्स किंमत सुमारे ८ लाख ३७ हजार रुपये

दुसऱ्या घटनेत, मासे आणि दारू

दादरा नगरहवेली, दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस मान्यता असलेला मद्य आपल्या राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असून, सिल्वासा येथून वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या मद्याच्या एकूण ३७९ बाटल्यांची नाशिकमार्गे गुजरातच्या दिशेने होणारी छुपी वाहतूक पकडली आहे. ही कारवाई  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ने वाघेरा-हरसूल रस्त्यावर कारवाई केली.

भरारी पथक क्रमांक-१चे निरीक्षक मधुकर राख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे त्यांनी गिरणारे-हरसूल मार्गावर वाघेरा फाटा येथे सापळा रचला होता, जीपमधून छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक होत आहे अशी गुप्त  माहिती दिली.

कारवाई करतांना अधिकारी दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, अरुण सुत्रावे, श्याम पानसरे, धनराज पवार, विलास कुवर सहकारी यांनी सापळा रचत महिंद्र बोलेरो जीप (जी.जे. १४, एक्स ६३९३) यावर पथकाला संशय आला. पथकाने जीप थांबवली, यातून मासे वाहतूक केले जात आहेत असा बनाव केला होता. मात्र पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने कसून तपासणी केली आणि  जीपचालक फरीद रखाभाई उनडजाम (३७) याला पकडले. या जीपमधून ३७९ दारूच्या बाटल्या पकडल्या एकूण १० लाख ५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल पथकाने पकडला आहे. smuggled liquor

आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा :

https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.