पेट्रोल दरवाढ कोणाच्याही हातात नाही : खा. संभाजी भोसले, रामशेज किल्ल्याला भेट

नाशिक : सध्या होत असलेली पेट्रोल दरवाढ कोणीही रोखू शकत नसून ती थांबवणे कोणाच्याही हातात नाही. या दरवाढीवर मी काय बोलणार, उलट पुढील राज्यसभा अधिवेशनात चांगल्या प्रकारे कामकाज झाले तर मी नक्कीच हा प्रश्न विचारणार आहे. असे मत खासदार संभाजी भोसले यांनी व्यक्त केले. petrol price hike chhatrapati sambhaji bhosle mp visits ramshej fort

रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्षखासदारछत्रपती संभाजी महाराज यांनी आज  रामशेज किल्ल्याला भेट देऊन त्याची पाहणी केली आहे. छत्रपती संभाजी राजेंच्या काळात घडलेल्या घटनांच्या आधारे या किल्ल्याला मोठा इतिहास आहे.

यावेळी पायथ्याशी असलेल्या गावातील लोकांसह नाशिककरांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. खासदार भोसले यांनी एका दमात संपूर्ण किल्ल्याची चढाई केली. यावेळी पूर्ण किल्ल्याची पाहणी केली त्याचा इतिहास समजून घेतला.

छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज असून रामशेज किल्ल्यावर येणारे छत्रपतींचे पहिलेच वंशज ठरले आहेत. petrol price hike chhatrapati sambhaji bhosle mp visits ramshej fort

किल्ले रामशेज देखरेखीसाठी शिवकार्य संस्थेला दत्तक द्यावा, खा. छत्रपतींकडे मागणी

रायगड विकास प्राधिकरणांतर्गत  राज्यातील सत्तेचाळीस किल्ले समाविष्ट केले जाणार असून, राज्य सरकार आणि केद्रात तसा बैठकीत निर्णय घेतला असून, यावेळी मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. ६०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे असे खासदार संभाजी भोसले यांनी स्पष्ट केले. 

petrol price hike chhatrapati sambhaji bhosle mp visits ramshej fort

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.