पेट्रोल १.२३ रुपये तर डीझेल ८९ पैशांनी महागले

petrol prices hike news nashik नाशिक : महागाईमुळे आधीच होरपळणाऱ्या जनतेची पर्वा न करता पेट्रोल आणि डीझेलची किंमत वाढविण्यात आली असून पेट्रोल १.२३ रुपये तर डीझेल ८९ पैशांनी वधारले आहे. बुधवार (दि. १ जून) पासून नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. या आधी १६ मे रोजी दर कमी करण्यात आले होते. मात्र त्याचा कोणताही फायदा महाराष्ट्रातील जनतेचा झाला नव्हता कारण दारूचा बुडणारा महसूल वसूल करण्यासाठीच कि काय म्हणून राज्य सरकारने अधिभार वाढवला होता.

सलग तीन आठवडे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण बघायला मिळालेली असताना हे दर वाढविण्यात आले आहेत. महागाई कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डीझेलच्या किमती सामान्य माणसाला परवडणारे असावेत असे असताना पेट्रोलच्या किमती वाढतच आहेत.

आधीच राज्यसरकार कडून पेट्रोलवर लावण्यात येणारा अधिभार वाढविण्यात आल्यानंतर पेट्रोलची किंमत घटल्याचा कोणताही फायदा महाराष्ट्राच्या जनतेला मिळाला नाही. राज्यात पेट्रोलवर सहा रुपये व्हॅट आता ११ रुपयापर्यंत पोचला आहे. फडणवीस सरकार अधिसूचना काढून वाढवलाच असून त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल महाग झाले आहे.

महागाईचे लोळ असे उठत असताना सरकारने पेट्रोलचे दर कमी करण्यावर भर देण्याचे धोरण अवलाम्ण्याचे अपेक्षित असताना केवळ दारूचा बुडणारा महसूल पेट्रोलच्या अधिभाराद्वारे सामान्य माणसाच्या खिशातून उकळला जात असल्याचे दिसत आहे.

सामान्यतः आता महाराष्ट्रात दिल्ली आणि इतर राज्यांपेक्षा पेट्रोल ६ ते  ७ रुपये महाग मिळत असून गोवा राज्यापेक्षा तब्बल २० रुपयांचा फरक दिसून येत आहे.

बुधवार (दि. १ जून) पासून सध्या नाशिकमधील पेट्रोलचे दर : ७७.२५ ते ७७.३० रुपये असे असार आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.