जनता दरबार : नागरिकांना छगन भुजबळ यांची आली आठवण,कामे लवकर होत

जनता दरबार नागरिकांना आली छगन भुजबळ यांची आठवण

पालकमंत्री यांनी विविध विषय सोडवण्यासाठी नाशिक येथे जनता दरबार घेतला आहे. यामध्ये नागरिकांनी आपले अनेक प्रश्न समोर ठेवले होते. यामध्ये प्रमुख प्रश्न होते रस्ते आणि शेतीसाठी पाणी आवर्तने असा विषय प्रमुख होता. त्यामुळे अनेक शेतकरी दरबारात जमा झाले होते. यावेळी विषय आणि प्रश्न सुरु होते तेव्हा काही शेतकरी उठले आणि म्हणाले की आम्हाला भुजबळ साहेब होते तेव्हा इतका त्रास झाला नाही. धरणात ५०% पाणी असून सुद्धा दोन पेक्षा अधिक आवर्तने सोडली जात होती. तर रस्ते होत होते. किमान लगेच मजुरी सुद्धा दिली जात होती. हे ऐकताच सभागृहात हसा झाला आणि खुद्द पालकमंत्री सुद्धा यावर हसले.

शेती पाणी संधर्भात प्रश्न उपस्थित करताना शेतकरी.

यावेळी अनेकांनी ”साहेब! भुजबळ साहेब मंत्री असतांना विकास होत होता. आता तुम्ही लक्ष घातले तरच काही तरी होईल”, असे सांगीतले आहे. निफाड तालुक्‍यातील एका शिष्टमंडळाने थेट तुलना करीत, ”साहेब भुजबळ साहेब होते तेव्हा धरणांत पन्नास टक्के साठा असतानाही शेतीला रोटेशन मिळत होते. यंदा तर धरणे भरली आहेत. आपण स्वतः जलसंपदा मंत्री आहत. तरीही पाण्याचा थेंबही मिळालेला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. भुजबळ साहेब असतांना विकास होत होता. आता तर तो ठप्प झालाय. विकास रुसलाय असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका,”  अनेकांना हसू आवरले नाही.

अनेक नागरिक जनता दरबारात आले होते.

राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पालकमंत्र्यांनी पुढाकार घेत जनता दरबार घेतला. त्यामुळे ग्रामीण भागातून प्रत्येक तालुक्‍यातून सरासरी १५०च्या वर  निवेदने आली होती.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.