आम्ही माजलोय पंचवटी एक्सप्रेस मधील सुविधा आम्हाला नकोय, अनेक ठिकाणी नासधूस

Exclusive Report ! वरील ठळक  बातमी वाचतांना वाचकांना थोडे असभ्य वाटेल, मात्र यासाठी दुसरा कोणता शब्द सुचला नाही. तुम्हाला वाटला तर नक्की कळवा. people destroyed Panchvati Express new coach seat handle toilet trey Nashik 

पंचवटी एक्सप्रेस म्हणजे नाशिक – मुंबईची जीवन वाहिनी. अनेक नागरिक, विद्यार्थी, प्रवासी, वकील, डॉक्टर, पत्रकार, फेरीवाले, राजकीय नेते असे हजारो लोक या गाडीने प्रवास करतात.  रोज सकाळी ७.१० नाशिक सोडते तर संध्याकाळी  ६.१० रोजी मुंबईहून रोज नागरिकांना सुखरूप वेळेत परत आणते. यामध्ये अनेक नोकरदार आणि विद्यार्थी, व्यापारी यांना तर फार महत्वाची गाडी आहे. त्यामुळे तिला थोडा जरी उशीर झाला तर नागरिक आंदोलने करतात आणि प्रशासनाला जाब विचारतात. people destroyed Panchvati Express new coach seat handle toilet trey Nashik 

टीव्ही खरेदीचा विचार करताय मग येथे क्लिक करा !

या गाडीचे महत्व ओळखून रेल्वे प्रवासी संघटना रेल परिषद आणि स्वर्गीय बिपीन गांधी यांनी  या गाडीत सुविधा निर्माण व्हाव्यात, गाडी सुंदर आणि आरामदायी असावी यासाठी आग्रही होती. आंदोलने, राजकीय मार्ग आणि अर्ज विनंती करून अखेर पंचवटी गाडीचे रूप बदलले आणि नवीन कोच सह आलिशान अशी पंचवटी दिमाखात दाखल झाली.रेल परिषदेने ‘आदर्श कोच सी-३’च्या माध्यमातून पंचवटी एक्स्प्रेसला पाच वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून दिलेले आहे.या एक्स्प्रेसला ४२ वर्षांनंतर नवे रंगरूप मिळाले आहे. नव्या गाडीत प्रवाशांची बैठक व्यवस्था अधिक आरामदायक असून, बोगींची अंर्तबाह्य रंग-रचना व कार्य नावीन्यपूर्ण आहे. सर्व कोचमध्ये बायोटॉयलेट्स आहेत. तर सीट अर्थात बैठक व्यवस्था उत्तम आरामदायक असून, पाणी ठेवण्या साठी आणि प्रवासात खाण्यासाठी ट्रे इतर स्वच्छता आणि उत्तम खिडक्या सोबतच समान  जागा दिली आहे. people destroyed Panchvati Express new coach seat handle toilet trey Nashik 

कचरा पेटीचे झाकण तोडून टाकले,

नाशिककरांच्या कुटुंबाचा भाग झालेली पंचवटी १ नोव्हेंबर १९७५ पासून धावत आहे. मनमाड ते मुंबई हे २६१ किलोमीटरचे अंतर ती वेगात पार करते. ४२ वर्षांनंतर पंचवटी एक्स्प्रेसला नवे रंग-रूप मिळाले आहे. मनमाड ते मुंबई प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक यांच्यासाठी पंचवटी सोयीची आहे. त्यामुळे ही गाडी, रेल्वेला भरघोस महसूल देते. रेल्वे प्रशासनाच्या व प्रवाशांच्या सहकार्याने पंचवटी एक्सप्रेसला ‘आदर्श ट्रेन’ करण्याचा रेल परिषदेने संकल्प केला आहे.people destroyed Panchvati Express new coach seat handle toilet trey Nashik 

लॅॅपटॉप शोधात आहात मग येथे क्लिक करा

प्रवासी वर्गाला खाद्य पदार्थ योग्य पद्धतीने खाता यावा म्हणून दिलेला ट्रे तोडून टाकले आहेत. सर्वत्र हे चित्र आहे.

मात्र गाडीतील सुविधा काही समाज कंटकांना नकोश्या दिसत आहेत. सीटचे हात तोडणे, सीट फाडणे आणि खाण्यासाठीचा ट्रे अक्षरश ताकद लावून तोडून टाकले आहे. बर हे नुकसान एका ठिकाणी नाही, जवळपास प्रत्येक ठिकाणी जोरदार नुकसान केले आहे. सोबतच सीट मागे करण्यासाठी असेलेले नॉब वाकवून तोडण्यासाठी तयार केले आहे. त्यामुळे उत्तम दिसणारी पंचवटी आता फार वाईट दिसत आहे. सोबतचा उत्तम असे भारतीया आणि इंग्रजी बैठक असलेले बायोटॉयलेट्स ची अवस्था तर अगदी वाईट केली आहे. हे पुड्या खाणारे वाचाळ  थुकरटतोंडे यांनी तर बेसिन आणि बायोटॉयलेट्स मध्ये लाल रंग मारला आहे.people destroyed Panchvati Express new coach seat handle toilet trey Nashik 

ट्रे साठी वर टिकून रहावे म्हणून दिलेले बटन तोडले त्यामुळे सर्वच ट्रे लटकत राहतात.

सोबतच    पार्श्वभाग योग्य पद्धतीने धुता यावा यासाठी लावलेले वायर स्प्रे  कधीच तोडून टाकले आहे. तर त्या जागी रेल्वेने आता चेन अर्थात साकळी लावलेले   टमरेल ठेवले आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करत   खर्च करत काही उपयोग झाला का असा प्रश्न पंचवटी कडे पाहिल्यावर पडतो. सोबतच बेशिस्त नागरीका परिवारासोबत सोबत जेव्हा काही खाद्यपदार्थ विकत घेतात त्यातील खरकटे सीट आणि त्याच्या खाली टाकतात. रेलेक्डून सुविधेची अपेक्षा करतो मग आपण नियम   का?   पाळत नाही असा प्रश्न पडतो.  जे   कोणी गुतका खाणारे थुकरटतोंडे बिमलचे भाऊ आहेत यांनी तर खिडक्या आणि त्यातील जागा सुपारीमय    लाल केली आहे.

सीटची झालेली बिकट अवस्था.

त्यामुळे आपल्याला माज आलाय का असा प्रश्न निर्माण होतो आहे.

श्रींमत होणार नक्कीच !  हे पुस्तक वाचा नक्की !

people destroyed Panchvati Express new coach seat handle toilet trey Nashik 

व्हिडियो :

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.