संदर्भ सेवा रुग्णालयात त्रस्त रुग्णाची आत्महत्या

दोनही किडनी निकामी झाल्याने उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. शालीमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयातील ही घटना असून गेल्या महिन्यातही एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. patient suicide sandarbh seva rugnalaya shalimar nashik

श्रीरामनगर (घोटी, इगतपुरी) येथील असलेल्या जवाहरलाल रामकिसन गुप्ता (वय 48) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. दोनही किडनी निकामी झाल्याने गेल्या ३१ जानेवारी पासून डायलिसीस वर त्यांचे उपचार सुरु होते.

आजाराने त्रस्त झालेल्या गुप्त यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची असल्याने त्यांनी नैराश्याने असे पाउल उचलल्याचे बोलले जात आहे.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नवीन वर्षात अशीच दुसरी घटना घडल्याने इतर रुग्णांची मानसिक स्थिती सुधृढ करणे यासह खिडक्यांना जाल्या लावण्याच्या कामाला प्रारंभ करावा अशी मागणी रुग्णालयातील रुग्नानाच्या नातेवैकांनी केली आहे.

patient suicide sandarbh seva rugnalaya shalimar nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.