येत्या आठवड्यात नव्या रुपात धावणार आपली आवडती   पंचवटी

अनेक वर्षांची मागणी पूर्ण our favorite panchvati express starts from next week new look comfort

नाशिक :नाशिक सह मनमाड भागातील रोज मुंबई येथे प्रवास करणाऱ्या   प्रवाशांची अत्यंत जिव्हाळ्याची पंचवटी एक्स्प्रेस नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. आता हीच नूतन रेल्वे येत्या आठवड्यात  असून, पुढील आठवड्यात मनमाडहून नवीन बोगींसह पंचवटी एक्स्प्रेस धावणार आहे. या गाडीच्या बोगींमध्ये बदल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.our favorite panchvati express starts from next week new look comfort

पंचवटी एक्सप्रेसचा प्रवास होणार चकाचक आरामदायक सुखकरपंचवटी एक्सप्रेस च्या संपूर्ण २१ नवीन बोगी येवला येथे पोहचल्या.

नाशिककरांच्या स्वप्नांना साकार करणारी, भारतीय रेल्वेत इतिहास घडविणारी, संपूर्ण नवी कोरी ‘आदर्श – पंचवटी एक्सप्रेस’ येवला येथे येऊन पोहचली आहे. या आठवड्यात ती ‘मनमाड ते मुंबई’ प्रवाशांच्या सेवेत धावेल. चला, हिचे स्वागत करून ही रेल्वे व त्यातील यात्रीगण उभयता आदर्शत्वाची मुहूर्तमेढ रोवू या. सर्वांच्या सहकार्याने ‘आदर्श – पंचवटी एक्सप्रेस’ ने प्रभू रामाच्या ‘रामरथ’ सारखा आदर्श घडवावा.

रेल परिषदेचे अध्यक्ष – बिपीन गांधी, गुरमितसिंग रावल, अशोक हुंडेकरी, पूजा लाहोटी  यांनी येवला येथे जावून ‘आदर्श – पंचवटी एक्स्प्रेस’ च्या नवीन रेक ( संपूर्ण २१ नवीन बोगी )  ची आंतरबाह्य रचना व कार्य ची समक्ष पाहणी केली. याकामी विविध सूचनाचा पाठपुरावा केला.

१ नोव्हेम्बर १९७५ पासून पंचवटी एक्सप्रेस दिमाखात धावत आहे. मनमाड ते मुंबई हे २६१ किलोमीटर चे अंतर ती वेगात पार करते. ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सप्रेस ला नवे रंग-रूप मिळनार आहे. नाशिक हे औद्योगिक, धार्मिक व शैक्षणिक केंद्र असल्याने हजारो लोक रेल्वेने रोज प्रवास करतात. मनमाड ते मुंबई प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक, विध्यार्थी, रुग्ण, पर्यटक यांच्यासाठी पंचवटी एक्स्प्रेस ही रेल्वे अतिशय सोयीची आहे. त्यामुळे ही गाडी, रेल्वेला भरघोस महसूल देते. नियमित प्रवास करणारे पासधारकांसाठी ‘पंचवटी एक्सप्रेस’ ही दुसरे घरच आहे. या रेल्वेत प्रवाश्यामध्ये कौटूम्बिक व जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. रेल परिषदेने ‘आदर्श कोच सी-३’ च्या माध्यमातून पंचवटी एक्सप्रेसला ५ वेळा “ लिम्का बुक ऑफ रेकोर्ड ” मध्ये स्थान मिळवून दिले आहे.

इंटरसिटी चा दर्जा असलेली पंचवटी एक्सप्रेस ला रोज उशीर होत असे, तसेच विविध समस्यान्नी ग्रासले होते. मध्य रेल्वेची प्रेस्टीजीयस, तर नाशिककरांची जीव्हाळाची असलेली पंचवटी एक्सप्रेस ही रेल्वे वेळेवर पोहोचावी, प्रवाशांना चांगली सोय मिळावी, सुकर प्रवास व्हावा. स्वच्छ कोच असावेत, विना तिकीट कोणी प्रवास करू नये, अनधिकृत खाद्यविक्रेते नसावेत, पाकीटमार नसावेत, भिकारी नसावेत. तसेच अन्य समस्या दूर करून गाडीला आत्मसन्मान मिळवून द्यावा. अशी भावना प्रवाश्यांकडून व्यक्त होत असे. महात्मा गांधी जयंती ( २ ऑक्टोंबर २०१७ ) पासून रेल प्रसासनाच्या व प्रवाशांच्या सहकार्याने पंचवटी एक्सप्रेस ला ’ आदर्श ट्रेन ’ करण्याचा रेल परिषदेने संकल्प केला.

ह्याकरिता रेल प्रशासनाशी विविध मागण्याचा सतत पाठपुरावा करीत असतोत. ह्याच अनुषंगाने रेल परिषद ने नवीन रेक ( संपूर्ण २१ नवीन बोगी ) मिळावी. अशी मागणी श्री पियुष गोयल ( रेल्वेमंत्री ) तसेच डी. के. शर्मा ( जनरल म्यानेजर, सेन्ट्रल रेल्वे – मुंबई )  ह्यांचे कडे केली होती. जनरल म्यानेजर – मुंबई यांनी त्याबाबत रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केला. संपूर्ण २१ नवीन बोगी ची ‘ इंटीग्रल कोच फ्याक्टरी – चेन्नई ’ येथे बांधणी झाली. आपल्याला सांगण्यास आनंद होतो कि, संपूर्ण नवी कोरी ‘आदर्श – पंचवटी एक्सप्रेस’ येवला येथे येऊन पोहचली आहे. या आठवड्यात ती ‘मनमाड ते मुंबई’ प्रवास अत्यंत सुखकर करील.

नवीन ‘आदर्श – पंचवटी एक्स्प्रेस’ साठीच्या ‘रेल परिषद’ च्या सर्व सूचनांची अंमलबजावणी झाली. प्रवाशांची बैठक व्यवस्था आरामदायक आहे. बोगीची आंतरबाह्य रंग – रचना व कार्य नाविण्यपुर्ण आहे. सर्व कोचना बायोटोयलेत आहे.

‘आदर्श – पंचवटी एक्स्प्रेस’ च्या नवीन रेक ( संपूर्ण २१ नवीन बोगी ) मिळणेसाठी ‘रेल परिषद’ ने सातत्याने विविध सूचनाचा पाठपुरावा केला. यासाठी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्या बद्दल रेल्वे प्रवाशांच्या वतीने ‘रेल परिषद’ मनापासून आभार मानते.

श्री पियुष गोयल ( रेल्वेमंत्री ), डी. के. शर्मा ( जनरल म्यानेजर, सेन्ट्रल रेल्वे – मुंबई ), डी. वाय. नाईक ( सी. पी. टी. एम. – मुंबई ), सुनील जोशी ( मुंबई ), रुपेश कोहली ( सी. आर. एस. ई. – मुंबई ), एल. सी. त्रिवेदी ( सी. एम. ई. – इंटीग्रल कोच फ्याक्टरी, चेन्नई ), डॉ. अब्दुल्लाह ( चेन्नई ), आर. के. यादव ( मंडल रेल प्रंबधक, भुसावळ ) व त्यांचे सहकारी.

ह्याकामी श्री हरिश्चंद्र चव्हाण (खासदार) व श्री हेमंत गोडसे (खासदार) ह्यांनी खूप सहकार्य केले. तसेच रेल्वेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व नियमित प्रवास करणारे पासधारक – प्रवाश्यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले. सर्व प्रसारमाध्यमांचा चांगला पाठींबा मिळाला. त्याबद्दल रेल परिषद प्रवाश्यांच्या वतीने सर्वांचे आभारी आहे.

मित्रानो आपला Whats App ग्रुप आहे आमचा 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेव करा नाशिकच्या बातम्या मिळावा ! बाजार भाव काय आहे ते रोज मिळवा !

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi, Your Name  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.