ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे  मोफत अलविदा डायबेटीस मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

(प्रसिद्धी पत्रक )

ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे  मोफत अलविदा डायबेटीस मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

नाशिकरोड- येथील साप्ताहिक नाशिक परिसरच्या 7 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन दि.  १६ जुलै रोजी येथील श्रीकृष्ण लॉन्स, बोधले नगर, नाशिक येथे  ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय प्रस्तुत मोफत  “अलविदा डायबेटीस” शिबीर सकाळी ६ ते संध्या. 6 पर्यंत सपूर्ण दिवस आयोजित करण्यात आले आहे.

पूर्ण दिवस शिबीरात उपस्तीत राहणार्यांसाठी चहा – नाष्टा व जेवणाची सोय उपलब्ध आहे. या शिबिरास मधुमेह तज्ञ डॉ. मल्हार देशपांडे,  डॉ.  उज्वल कापडणीस यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. भव्य एल ई. डी. स्क्रीन वर दृक श्राव्य माध्यमातून अतिशय सोप्या भाषेत मधुमेह या आजाराविषय माहिती देण्यात येणार आहे. सोबतच प्रक्टिकल एक्सरसैझ च्या माध्यमातून शरीर स्वास्थ्या वर विशेष मार्गदर्शन करण्यात येइल. विशेषतः ब्रह्मकुमारी संस्थे तर्फे शिकविण्यात येणारा राजयोग मेडीटेशन आपली जीवन शैली कशी सुधारतो याचे स्पष्टीकरण या शिबिरात देण्यात येणार आहे.

मधुमेहाची गुंतागुंत अर्थात कॉम्प्लीकेशान्स काय असतात व या पासून आपला बचाव कसा करावा याचे येथे विशेष स्लाईड शो द्वारे समजविण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून डायबेटीस असेल तर नियंत्रण होईल, नसेल तर कधीच होणार नाही, असा अनुभव हे शिबीर केल्या नंतर येतो त्या मुळे हे शिबीर प्रत्येकाने करावे असे आवाहन ब्राह्मकुमारी संस्थेच्या नाशिक मुख्य सेवा केंद्र संचालिका राजयोगिनी ब्राह्मकुमारी वासंती दीदी यांनी केले आहे  पूर्ण दिवस कार्यक्रम चा लाभ घेणाऱ्यांसाठी चहा , नाष्टा व जेवण्याची सोय आहे.

यासाठी मोफत नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी साठी मोबाईल नंबर – नाशीक रोड- 9860077819, पंचवटी- ९४२३४८१९७३, द्वारका- ९०२८९०९३८४ या ठिकाणी संपर्क करावा. किवा ऑन लाइन  नोंदणी साठी लिंक- (Free online registration

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdctF_OZNHg9wo5xeo1qRVU7v5B7i8isW5n29jT0fdgOfXl8Q/viewform?c=0&w=1

           सोबतच  साप्ताहिक नाशीक परिसर तर्फे उपलब्ध स्टॉल्स मधून श्री दत्त क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी २ ते ४ यावेळेत त्वचा विकार तपासणी शिबीर, मातोश्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी २ ते ४ यावेळेत रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी शिबीर, वाबळे हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने दुपारी २ ते ४ यावेळेत महिलांची आरोग्य तपासणी शिबीर, तसेच संस्कृती हॉबी क्लासेस  यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी २ ते ४ यावेळेत खास महिलांसाठी आईसक्रिम मेकिंग वर्कशॉप, वेव्ह वूमन टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे महिलांसाठी करियर मार्गदर्शन व   लकी ड्रॉ चे आयोजन स्टॉल वर करण्यात आले आहे.

तसेच हेंनरी सर इंग्लिश स्पिकिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी २ ते ४ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  यात गट क्र.  १ (केजी ते ३ री) गट क्र.२ (४ थी ते ७ वी),  गट क्र.३ (इ.  ८ वी ते १० वी) व गट क्र.४ (११ वी पुढील विद्यार्थी) असे विविध गटातुन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  स्पर्धेसाठी प्रवेश फी फक्त रु.  २० ठेवण्यात आली असून गतिमंद व दिव्यांगासाठी मात्र  प्रवेश विनामुल्य असेल.  या विषयीच्या अधिक माहितीसाठी ९९२२९६०१२५, ९६८९२१८३७७ या क्रमांकावर साधावा.

       सायंकाळी ६ च्या सत्रात गोल्डन बिट ऑर्केष्ट्रा  तर्फे सुमधुर हिंदी, मराठी, देशभक्ती व भावगीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.  त्याबरोबरच चित्रकला स्पर्धेत बशीस पात्र विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात येतील..  या  कार्यक्रमांसाठी आयडीयल कोचिंग क्लासेस, वेव वुमन टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, सोनी गिफ्ट, हेंनरी स्पोकन इंग्लिश यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.  वरील  कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान ब्रह्मकुमारी संस्थे तर्फे करण्यात आले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.