जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कॉस्मोपिपलच्या ग्रेस फाउंडेशन अंतर्गत ‘ऑर्गनेशन’ उपक्रम

अवयवदान जनजागृतीसाठी विशेष मोहिमेला सुरुवात

नाशिकमध्ये असलेल्या कॉस्मोपिपल ग्रुपच्या “ग्रेस फाउंडेशन” अंतर्गत सी.एस.आर. अर्थात सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून  जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून अवयवदान जनजागृती विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांकडून कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही.

समाजामध्ये अवयवदानाबाबत अजूनही हवीतशी जनजगृती झालेली नाही. त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना अवयव मिळत नसल्याने फार गंभीर स्थितीला सामोरे जावे लागते. योग्य प्रकारे अवयवदान करणे नागरिकांना कळाले तर अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येणार आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आणि नियमित अवयवदानबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे ओळखून कॉस्मोपिपलच्या ग्रेस फाउंडेशन अंतर्गत “ऑर्गनेशन ” ही विशेष मोहीम राबवली जात आहे. विशेष म्हणजे ह्या मोहिमे अंतर्गत विविध कार्यक्रम, कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. दर महिन्याला होणाऱ्या ह्या कार्यशाळेत प्रसिद्ध डॉक्टर, सामाजिक संस्था, चळवळीत काम करत असलेले सामाजिक कार्यकर्ते विशेष सहभाग नोंदवणार आहे.

अवयवदान याविषयावरचे पोस्टरचे अनावरण यावेळी करण्यात आले. यावेळी कॉस्मोपिपलचे संस्थापक स्वप्नील खैरनार, स्वराज फाउंडेशनचे अॅडव्होकेट आकाश छाजेड, बी.एल.व्ही.डी. चे व्यवस्थापक कपिल शेवाळे, सहयाद्री हॉस्पिटलचे डॉ. महेश राजेंद्र, सह्याद्री हॉस्पिटलचे व्यवस्थापक संजय चावला, शिल्पी अवस्थी, मिसेस इंडिया इंटर नॅशनल २०१७.

ग्रेस फाउंडेशन अंतर्गत ऑर्गनेशन  जनजागृती मोहिमेत अवयवदान म्हणजे काय ? त्यांचे फायदे काय आहेत ? त्यामुळे किती रुग्णांचे प्राण वाचू शकतात ? आदी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहेत. सोबत ज्या व्यक्तींना अवयवदान करावयाचे आहे त्यांना कॉस्मोपिपल तर्फे संपूर्ण सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.  कॉस्मोपिपलच्या https://www.facebook.com/cosmopeople  या फेसबुक पेजवर नियमित माहिती उपलब्ध करण्यात येणार असून,http://www.cosmopeople.in/ या संकेत स्थळावर ऑर्गनेशन  (Organation) या स्वतंत्र तालिकेत सर्व माहिती मोफत उपलब्ध केली जाणार आहे. या मोहिमेविषयी अधिक माहिती किंवा सोबत काम करावयाचे असल्यासोबत संपर्क साधू शकतात.

या पत्रकार परिषदेस कॉस्मोपिपलचे संस्थापक स्वप्नील खैरनार, स्वराज फाउंडेशनचे  अॅडव्होकेट आकाश छाजेड,  बी.एल.व्ही.डी. चे व्यवस्थापक कपिल शेवाळे, सहयाद्री हॉस्पिटलचे डॉ. महेश राजेंद्र, सह्याद्री हॉस्पिटलचे व्यवस्थापक संजय चावला, शिल्पी अवस्थी, मिसेस इंडिया इंटर नॅशनल २०१७   उपस्थित होते.

पहिली जनजागृती कार्यशाळा :

यानंतर १५ एप्रिल २०१८ रोजी पहिली जनजागृती कायर्शाळा बी.एल.व्ही.डी. येथे होणार आहे. बी.एल.व्ही.डी. हॉटेलने कोणतेही शुल्क न आकारता या मोहिमेस पाठींबा देत जागा उपलब्ध करून दिली आहे.

श्री. स्वप्नील  खैरनार, संस्थापक  संचालक, कॉस्मोपिपल, सांगतात की, “ शरिरातील ऑर्गन अर्थात अवयव कोणता ही असो तो महत्वाचा आहे. एखादा अवयव निकामी झाला तर अनेक संकटे येतात. मात्र रुग्णांना जर कोणी अवयव दान केले तर त्याचे प्राण वाचवले जाऊ शकतात,देशात ५ लाख रुग्ण अवयव दान नाही म्हणून दगावतात, एक लाख पैकी फक्त  काही हजार रुग्णांना लिवर मिळते. देशात २ लाख २२ हजार पेक्षा अधिक रुग्णांना किडनी गरजेची असून फक्त १५ हजार रुग्णांना किडनीदान मिळते. २०१३ नंतरची आकडेवारी आपण पहिली तर ०.५ % लोकच अवयव दान करतात. त्यामुळे ही गरज ओळखून आम्ही  ग्रेस फाउंडेशन अतर्गत अवयव दान श्रेष्ठ दान अर्थात ऑर्गनेशन  ही न थांबणारी मोहीम सुरु केली आहे.”

शिल्पी अवस्थी, मिसेस इंडिया इंटर नॅशनल २०१७, ब्रॅड अॅम्बेसेडर “ मला या उपक्रमात सहभागी होत असल्याचा आनंद आहे. मला मिळत असलेल्या प्रसिद्धीचा उपयोग या समाजपयोगी विषयासाठी करणार असून, त्यामुळे नक्कीच या मोहिमेला फायदा होणार आहे. या ठिकाणीच नाही तर जेथे जेथे मला व्यासपीठ मिळेल तेथे, या मोहिमेची ब्रॅड अॅम्बेसेडर सेलिब्रेटी चेहरा म्हणून तेथे नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहे.”

डॉ. महेश राजेंद्र, सह्याद्री हॉस्पिटल “ अवयवदानाविषयी हळूहळू नागरिकामध्ये जागरूक होतांना दिसत आहे. मात्र योग्य पुरेशी माहितीचा अजूनही अभाव आहे. सोबतच लोकामध्ये अनेक गैरसमजही आहेत. अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी या प्रकारच्या मोहिमा होणे फार गरजेचे आहे, हेच ओळखून सह्याद्री हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपत कॉस्मो पिपल सोबत काम करायचे ठरविले आहे.”

अॅडव्होकेट आकाश छाजेड, स्वराज फाउंडेशन,“आम्ही अवयवदान चळवळीत काम करत आहोत. अजून खूप काम करण्याची गरज असून,त्यासाठी जे नवीन प्रयत्न करत आहेत. त्या सर्वाना आम्ही नक्कीच मदत करणार असून, ही चळवळ कशी व्यापक करता येईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत.”

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.