छगन भुजबळ यांच्या वाढदिवशी राज्यभर ‘अवयव दानाचा’ संकल्प

नाशिक,दि.२ ऑक्टोबर :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१५ ऑक्टोबर २०१७ रोजी राज्यभर ‘अवयव दानाचा’संकल्प करण्यात आला असून  विविध अभिनव सामाजिक उपक्रमातून यंदाचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या संदर्भात समता परिषदेच्या राज्य समन्वय समितीची बैठक आ. पंकज भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली भुजबळ फार्म, नाशिक येथे संपन्न झाली. बैठकीत वाढदिवसासोबतच २८ नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या समता दिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारी बाबत चर्चा झाली. सदर बैठकीत हा संकल्प करण्यात आला.

बैठकीला आ. जयवंतराव जाधव, बापू भुजबळ, डॉ. कैलास कमोद, दिलीप खैरे, डॉ. गणेश खारकर, प्रा.दिवाकर गमे, अनिता देवतकर, चंद्रकला पाथरे, शालिनी गायकवाड, जयराम साळुंखे, डॉ.संजय गव्हाणे, सुभाष देवरे, आशिष मोरे, डॉ.डी.एन. महाजन, दत्तात्रय घाडगे, भगवान बिडवे, मकरंद सावे, नाशिकचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक,शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, दत्ता खरात आदी उपस्थित होते.

organ donation camp on the occasion of chhagan bhujbal birthday samata parishad

शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयवरुपी जिवंत रहायचे असेल तर अवयव दान करणे गरजेचे आहे. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो.  तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत.

अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरते मर्यादित नसून शरिराचे सुमारे  १०  विविध अवयव आपण दान करू शकतो. याचे प्रबोधन होण्यासाठी आ.छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राज्यभरात अवयवदानाचा संकल्प करण्यात आला आहे. राज्यभरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून अवयवदानाचे शिबीर घेऊन अवयव दान करणाऱ्या नागरिकांचे अर्ज भरून घेतले जाणार आहे. तसेच त्यांना भेट म्हणून एक रोपटे देखील देण्यात येणार आहे. अवयवदानाबरोबरच पर्यावरण संवर्धन करण्यासाठी हजारो झाडे लावली जाणार आहे.

त्याचबरोबर राज्यभर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना मदत, अनाथ आश्रम व आदिवासी आश्रमशाळा येथील गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप, वृद्धाश्रमात व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन, अंध अपंग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थाना मदत, रूग्णालयामध्ये फळवाटप, अन्नदान यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.