onion rate कांदा लिलाव बंद,किरकोळ बाजारात भाव वाढण्याची शक्यता

कोरोनामुळे आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच कांद्य बाजारपेठांमध्ये कांदा लिलाव बंद राहणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कांदा भाव शंभरी गाठणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.onion rate

चीनमधून येणाऱ्या करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर करोनाच्या भीतीने कामगारांनी देखील बाजार समितीमध्ये येण्यास नकार दिला. त्यामुळे कांदा आणि धान्याची विक्री कशी करायची? असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर लासलगाव बाजार समितीची बैठक झाली आणि या बैठकीत व्यापाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र दिले. onion rate

त्यामुळे कांदा आणि धान्य लिलाव लॉकडाऊनपर्यंत अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले. या निर्णयामुळे पुन्हा एकदा कांद्याचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे  पुन्हा एकदा कांद्याचे भाव गगनाला भिडणार असून कांदा पुन्हा एकदा शंभरी गाठणार आहे. दुसरीकडे कांद्याचे आणि धान्याचे लिलाव पूर्ववत कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरु राहणार असल्याचे बाजार सामितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले आहे.onion rate

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.