कांदा दर घसरण सुरु, नाफेडसमोर पेच, शेतकरी राजा हवालदिल

नाशिक : जिल्ह्याची ओळख आणि नगदी पिक असलेला उन्हाळ कांदा या सप्ताहात कमाल भावात शंभर रूपयाने घसरला असून, इतर राज्यातून दाखल होत असलेल्या लाल कांद्यामुळे उन्हाळ कांद्याला जबर फटका बसायला सुरुवात झाली. मागे दोन दिवस दि. ७ व ८ रोजी विक्री  झालेला ११४५ रूपयांचा कमाल भाव सोमवारी दि.१३ लिलावात जाहीर झाला.

मागील काही दिवसांपासून लाल कांद्याच्या पिकाला अनपेक्षितपणे तेजी होती. मात्र उन्हाळ कांदा एकदाही या हंगामात तेजीत आलाच नाही. उलट त्यामुळे आर्थिक फटका बसतो आहे. आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात  मिळवण्याची अपेक्षा असेलल्या जपून साठविलेला कांदा कमी दरात विक्री  होत असताना पाहून कांदा उत्पादक चिंतेत सापडला आहे.

त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण सुरु च असून केन्द्राने केलेल्या उपाययोजना देखील कांदा घसरणीला थांबवू शकल्या नाहीत. कांद्यावरील किमान निर्यात मूल्य दर शून्य तसेच कांदा निर्यात प्रोत्साहन पाच टक्के अनुदान आहे. तरीही कांदा दर सुधारत नसल्याचे समोर आले आहे.

जुलैत तेजीत असलेला कांदा एक ऑगस्ट मध्ये हजार रु पयांच्या घरात आला आहे. म्हणजे कांद्याच्या दरामध्ये २५ टक्क्यांची घसरण झाली आहे.  मागील महिन्यात पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे कांदा निर्यातदारांना घेता आला नाही. वाहतूकदारांच्या या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला पाच ते सहा लाख क्विंटल कांदा चाळीत पडून होता. बदलत्या वातावरणाचा फटका चाळीत साठवलेल्या कांद्याला बसत असून आज मिळणा-या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. तर दुसरीकडे नाफेड संकटात सापडली आहे. कोणता उपाय करावा याबाबत विचार करत आहेत. नाफेडमार्फत केंद्राने  किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असे सुचवले त्यानुसर १३ कोटी रु किंमत असेलला १२ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला मात्र आता उर्वरित १३ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला तर ठेवायचा कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.