कांदा घसरला : दोन दिवसात जवळपास १२०० रुपयांची घसरण

नाशिक : चांगला भाव मिळत असतांना अचानक कांदा भाव पुन्हा घसरत आहेत. काल बंद नंतर आज सुरु झालेल्या कांदा लिलावात पुन्हा भाव पडले आहे. या आगोदर ९०० रु तर त्यात तीनशे रुपयांची वाढ होत लासलगाव बाजार समितीत १२०० रुपयांनी प्रती क्विंटल  कांदा घसरला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला आहे. निर्यात शुल्क कमी जास्त केल्याने हा फरक पडला आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये पुन्हा ३०० रुपयांची घसरण दिसून आली. यामध्ये बाजार सुरु होताच उत्तम लाल कांद्याला सरासरी १६५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होत. तर याचवेळी समितीमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन  कांदा हा गुजरात, मध्यप्रदेश इतर राज्यातील बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कांदा आवकमध्ये मोठ्या प्रमाणत  वाढ झाली आहे. तर एकीकडे आपल्या देशात मागनीच्या तुलनेने पुरवठा थोडा वाढला आहे. कांद्यावरील निर्यात मूल्य दर हे ७०० डॉलर असल्याने देशातील निर्यातिला जबर फटका बसला आहे.याच कारणामुळे कांदा दरात मोठी घसरण सुरु आहे आणि शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसत आहे.

शहरी भागातून कांदा दर वाढीची ओरड होताच सरकार सरकारने हस्तक्षेप करत निर्यात मूल्यात वाढ केली. त्यामुळे निर्यात फार कमी झाली त्यामुळे भाव पडले आहे. याचा सर्वाधिक मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. त्यामुळे आता आता तरी शासनाने किमान निर्यात मूल्य दर ७०० डॉलर वरुण शून्य करावे अशी मागणी होत आहे.आज येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची ६०० नगांची  आवक होऊन लाल कांद्याला कमीत कमी ९५० सरासरी १६५० तर जास्तीत जास्त १९०५ भाव होते.

  • २३ जानेवारी – सरासरी भाव -२९००
  • ३० जानेवारी – सरासरी भाव -१९५१
  • ३१ जानेवारी – सरासरी भाव -१६५०
  • खानदेशातून सरकारवर जोरदार टीका :http://nashikonweb.com/hai-she-man-sarkar-farmer-criticism-on-govt/
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.