कांद्याच्या दरात 900 रुपयांची घसरण, माथाडी कामगार संप बाजार बंद

कांद्याच्या दरात 900 रुपयांची घसरण, माथाडी कामगार संप बाजार बंद

लासलगाव : गेल्या तीन दिवसांच्या सुटीनंतर आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये 900 रुपयांची घसरण दिसून आली आहे. तर माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे आज बाजारपेठ पूर्ण बंद होती. त्यामुळे कोणतेही व्यवहार होऊ शकले नाही.

लासलगाव बाजार समितीमध्ये २५ जानेवारीच्या तुलनेत आज  कांद्याच्या सरासरी भावात ८०० रुपयांची प्रति क्विंटल घसरण झाली आहे. नवीन  कांदा गुजरात, मध्यप्रदेश इतर राज्यातील बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने आवकमध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे भावात घसरण दिसून आली.

परतीचा पाऊस फार काळ लांबल्यामुळे तसेच ओखी वादळाचा बसलेला तडाखा यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी प्रमाणात येत असल्यामुळे कांद्याच्या भावात वाढ होत चार हजार रुपयांचा टप्पा पार केल्यानंतर केंद्र सरकारने शहरी भागातील ग्राहकांना कांदा कसा स्वस्त मिळेल यासाठी निर्यातमूल्य दर ७०० डॉलर  केल्याने कांद्याची होणारी निर्यात ही बंद आहेत. पुणे येथून उन्हाळ कांद्याची आवक आणि गुजरात राज्यात येणारी लाल कांद्याची आवक मुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण होऊन शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसत आहे.आज येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची १९५१६ क्विंटल आवक होऊन लाल कांद्याला कमीत कमी ९०० सरासरी १९५१ तर जास्तीत जास्त २४०० भाव होते

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.