कांदा @८००

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या सरासरी दरामध्ये 20 टक्के एवढी वाढ झालेली आहे. कांद्याला मिळालेला 800 रुपये भाव हा गेल्या तीन महिन्यात मिळालेला उंचाक भाव असल्याची नोंद झालेली आहे.सलग आलेल्या सुट्टीमुळे सोमवार पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद राहणार असल्याने शेतकरी वर्गाला याचा फटका बसणार आहे. लासलगाव येथील मुख्य बाजार समितीत कांद्याला सरासरी 800 रुपये भाव मिळालेला असून शुक्रवारी याच कांद्याला 675 रुपये प्रति क्विंटल मिळालेला होता.

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने कांद्याच्या दरात वाढ झालेली आहे.उन्हाळ कांद्याची आवक कमी झालेली असल्याने तसेच नवीन कांदा बाजार समितीत मोठ्या प्रमाणात येत नसल्याने कांदा भाव हे वाढत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

चांगला भाव मिळेल या आशेने शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणत कांदा हा साठवलेला होता,परंतु वातावरणाच्या फटाक्यांमुळे कांद्याच्या वजनात आणि प्रतवारी मध्ये घट होत आहे.त्यात आता कांद्याला भाव जरी चढे दिसत असले तरी शेतकरी वर्गाला  मिळणाऱ्या पैशातून उत्पादन खर्च हि निघत नसल्याने संकटात शेतकरी सापडलेला आहे.

आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत  कांद्याला कमीत कमी 450 सरासरी 800 जास्तीत जास्त 925 भाव मिळाले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.